महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्युत विभागाने तोडलेले विद्युत कनेक्शन 'आप'ने पुन्हा जोडले

जे वीजबिल भरणार नाहीत, त्यांचा वीजपुरवठा खंडीत करा असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. ऊर्जामंत्र्यांच्या आदेशानुसार महावितरणकडून वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. मात्र 'आप'ने महावितरणविरोधात मोहीम उघडली असून, 'आप'च्या वतीने खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडण्यात येत आहे.

विद्युत विभागाने तोडलेले विद्युत कनेक्शन 'आप'ने पुन्हा जोडले
विद्युत विभागाने तोडलेले विद्युत कनेक्शन 'आप'ने पुन्हा जोडले

By

Published : Mar 14, 2021, 7:47 PM IST

नागपूर -जे वीजबिल भरणार नाहीत, त्यांचा वीजपुरवठा खंडीत करा असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. ऊर्जामंत्र्यांच्या आदेशानुसार महावितरणकडून वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. मात्र 'आप'ने महावितरणविरोधात मोहीम उघडली असून, 'आप'च्या वतीने खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडण्यात येत आहे. आज नागपूरमध्ये गाडगे नगर परिसरात आपच्या कार्यकर्त्यांनी विद्युत पोलवर चढून वीजपुरवढा सुरुळीत केला आहे.

नागपूरच्या गाडगे नगर रामनामारोती परिसरात वीजबिलाचा भरणा न केल्याने एकाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. तसेच संबंधित ग्राहक हा वीजबिलाची काही रक्कम भरण्यास तयार असल्याचा देखील दावा करण्यात आला आहे. मात्र तरीदेखील महावितरणने त्यांचा वीजपुरवठा खंडित केला असा आरोप आपच्या वतीने करण्यात आला आहे.

विद्युत विभागाने तोडलेले विद्युत कनेक्शन 'आप'ने पुन्हा जोडले

आपची विद्युत जोडणी मोहीम

दरम्यान विद्युत विभागाच्या विरोधात आपने विद्युत जोडणी मोहीम हाती घेतली आहे, या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आज आपने नागपूरमधील गाडगे नगर परिसरात राहणाऱ्या या व्यक्तीचा विद्युतपुरवठा पुन्हा एकदा सुरळीत करून दिला आहे. या मोहिमेत नागपूर संयोजक कविता सिंघल, नागपूर संघटन मंत्री शंकर इंगोले, नागपूर शहर सचिव भूषण ढाकूलकर, विदर्भ युवा संयोजक पीयूष आकरे हे सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details