नागपूर- नागपूर जिल्ह्यात बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. यात मागील काही दिवसांत बरे होणारे रुग्ण संख्या घटली आहे. शिवाय रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या घटून 322 असून, घरात राहून उपचार घेणाऱ्यांची किंवा ज्यांना लक्षणे कमी असलेले रुग्णही आता 1210 वर आले आहेत. यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 97.79 इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात सोमवारी आलेल्या अहवालात 7 हजार 818 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 46 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरी भागात 28 तर ग्रामीण भागात 17 बाधित रुग्ण मिळून आले आहे. तसेच 3 रुग्ण दगावले आहेत. यामध्ये शहरी भागात 2, तर ग्रामीण भागात 0, तर जिल्ह्याबाहेरील 1 रुग्ण दगावला आहे. व 281 रुग्णांपैकी शहरात 210 तर ग्रामीण 71 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यात 322 रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत असून, 1 हजार 210 रुग्ण हे होम आयसोलेशन मध्ये आहे.
बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 4 पटीने अधिक - nagpur corona cases
नागपूर जिल्ह्यात सोमवारी आलेल्या अहवालात 7 हजार 818 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 46 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शहरी भागात 28 तर ग्रामीण भागात 17 बाधित रुग्ण मिळून आले आहे. तसेच 3 बाधित दगावले आहेत. तेच 281 रुग्णांपैकी शहरात 210 तर ग्रामीण 71 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यात 322 रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत असून 1 हजार 210 रुग्ण हे होम आयसोलेशन मध्ये आहे.
आतापर्यंतची परिस्थिती
आतापर्यंत सक्रिय रुग्णसंख्येत घटून 1 हजार 532 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 4 लाख 76 हजार 6 रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. यातून 4 लाख 65 हजार 949 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात मृत्यूचा आकडा हा 9010 वर जाऊन पोहचला आहे. नागपूरात सध्या रिकव्हरी रेंट हा 97.79 टक्क्यांवर वर असून रोज यात वाढ होत आहे.
सहा जिल्ह्यात 141 बाधितांची संख्या
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 606 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यात 141 नवीन बधितांची नोंद झाली आहे. 10 रुग्ण हे कोरोनाचे बळी ठरले आहे. यात बाधितांच्या तुलेनेत 465 अधिकचे रुग्ण हे कोरोमुक्त झाले आहे. यात नागपूरचा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दर 0.6 टक्के, विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होत 0.77 वर आला आहे.
हेही वाचा- मंगळवारी 655 नवे रुग्ण, तर 11 कोरोना बाधितांचा मृत्यू