नागपूर- इयत्ता बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपी करताना पकडल्याने राज्य शिक्षण मंडळाने फेर परीक्षा देण्यास सांगितले होते. या निर्यणाच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे आव्हान देण्यात आले होते. भरारी पथकाने रंगेहात पकडल्याने फेर परीक्षा द्यावी लागणार, असा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
काय आहे प्रकरण
वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील आर.के. विद्यालयात शिकणारी विद्यार्थीनी ही 26 फेब्रुवारी, 2020 ला नियमित बाराव्या वर्गाची परीक्षा देत होती. याच दरम्यान रसायन शास्त्राचा पेपर सुरू होता. राज्य शिक्षण मंडळाने नेमलेले भरारी पथक परीक्षा केंद्रावर पोहोचले. यावेळी भरारी पथकाने तिला कॉपी असताना रंगेहाथ पकडले. यामुळे तिला पेपर लिहण्यास मानाई करत कारवाई करण्यात आली. यात राज्य शिक्षण मंडळाने तिला पुन्हा पेपर देण्यास सांगितले. मात्र, हा निर्णय मान्य नसल्याने तिने या विरोधात नागपूर खंडपीठात आव्हान दिले.
खिडकीतून फेकताना दिसल्याने झाली होती कारवाई