महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिकीट काढून बघता येईल कारागृह, राज्य सरकारची नवी घोषणा - prison tourism will start in Maharashtra

राज्यात 26 जानेवारीपासून कारागृह पर्यटन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. कारागृह पर्यटनासाठी खुले करण्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याचे देशमुख यांनी सांगितले. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देशातील पहिले कारागृह पर्यटन महाराष्ट्रात सुरु होणार
देशातील पहिले कारागृह पर्यटन महाराष्ट्रात सुरु होणार

By

Published : Jan 23, 2021, 12:08 PM IST

Updated : Jan 23, 2021, 4:59 PM IST

नागपूर - राज्यात 26 जानेवारीपासून कारागृह पर्यटन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. कारागृह पर्यटनासाठी खुले करण्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याचे देशमुख यांनी सांगितले. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देशातील पहिले कारागृह पर्यटन महाराष्ट्रात

येरवडा कारागृह पर्यटकांसाठी खुले

पहिल्या टप्यात येरवडा जेलमध्ये पर्यटन सुरू होईल, ज्यात शाळकरी विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपला इतिहास जाणून घेता येणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले. राज्यात 45 ठिकाणी 60 कारागृह आहेत. त्यामध्ये 24 हजार कैदी आहे, तीन हजार कैद खुल्या कारागृहात आहेत. राज्यातील काही कारागृहांत ऐतिहासिक घडामोडी घडल्या आहेत.

प्रजासत्ताक दिनी शुभारंभ

या पर्यटनाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी होणार आहे. मुंबईतून मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातून आणि गृहमंत्री अनिल देशमुख गोंदिया येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून उदघाटन करणार आहेत. पुण्यानंतर नाशिक व ठाण्यासह इतर कारागृहात पर्यटन सुरू करण्यात येईल.

शुल्कही आकारले जाणार

कारागृह पाहण्यासाठी शुल्कही आकारले जाणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी 5 रुपये, महाविद्यालययीन विद्यार्थ्यांसाठी 10 रुपये आणि इतर सामान्य नागरिकांसाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात येईल अशी माहिती देशमुख यांनी दिली.

हेही वाचा -कशाला आलात, मी सांगितले होते येऊ नका! अण्णांनी फडणवीस, विखेंना सुनावले

Last Updated : Jan 23, 2021, 4:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details