नागपूर- नागपूरच्या लकडगंज परिसरात लाकूड बाजारात आज (दि. 17 सप्टें.) सकाळच्या सुमारास मोठी आग लागली होती. या आगीत टिंबर मार्केटमध्ये असलेल्या चार दुकानांचा मोठा नुकसान झाल्याची माहिती आहे. मात्र, सकाळच्या वेळी आग लागल्याने या आगीत सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
टिंबर मार्केटला लागलेल्या आगीत मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही
नागपूरच्या लकडगंडज परिसरात असलेल्या लाकूड बाजारात सकाळच्या सुमारास मोठी आग लागली होती. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अग्निशामक दलाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की लकडगंज पोलीस ठाण्यासमोर असलेल्या आरा मशीन कारखाना (लाकूड कापण्याच्या कारखाना) परिसरात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. सर्व बाजूला लाकूड आणि प्लायवूड असल्याने या आगीने रौद्ररुप धारण केले. आगीवर निरयंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाचे 13 बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. दरम्यान, तोपर्यंत चार आरा मशीन आणि दुकानांचे मोठे नुकसान झाले होते. ही आग सकाळच्या सुमारास लाकल्याने या कारखान्यांत काम करणारे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नव्हते. यामुळे जीवितहानी टळली.
हेही वाचा -नागपुरात विकेंद्रित पद्धतीने कोविड केंद्र उभारण्यात यावीत - फडणवीस