नागपूर - शहरातील एमआयडीसी भागातील बेकायदेशीर असलेल्या ‘झिरो डिग्री’ बारवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला. पहाटेपर्यंत बेकायदेशीर हा बार असतो सुरु असल्याने ही कारवाई करण्यात आली. तर मालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूरमध्ये 'झिरो डिग्री'वर गुन्हे शाखेची कारवाई, मालकाविरोधात गुन्हा दाखल - Nagpur crime branch raid
नागपूर शहरातील एमआयडीसी भागातील बेकायदेशीर असलेल्या ‘झिरो डिग्री’ बारवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकली. पहाटेपर्यंत बेकायदेशीर हा बार असतो सुरु असल्याने ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा - स्वतंत्र स्मशानभूमीसाठी नांदेडात तृतीयपंथीयांचे महापालिकेसमोर आंदोलन
यावेळी पोलिसांना बारमध्ये ५८ ग्राहक आढळले. यामध्ये तरुण-तरुणींची संख्या अधिक होती. तसेच अल्पवयीन तरुण असल्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तविली आहे. ‘झिरो डिग्री’ बार हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. असामाजिक तत्वे असेलेले लोक इथे नेहमी ये-जा करतात. या आधी देखील याठिकाणी दोन वेळा पोलिसांनी धाड टाकली आहे. मात्र, बार मालकाच्या वागणुकीत बदल काहीच बदल झाला नाही. तर शहरातील बार आणि पबवर सुरू असलेल्या धाड सत्रांमुळे बार मालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.