नागपूर- उमरेड शहरातील गांधीसागर तलावात आज एका नवजात बाळाचा मृतदेह आढळून आला आहे. पुरुष जातीचा हा मृतदेह दुपारच्या वेळेस एका इसमाच्या निदर्शनात आल्यानंतर त्याने उमरेड पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा नोंद करून बाळाच्या आईचा शोध सुरू केला आहे.
उमरेड शहरातील गांधीसागर तलावात आढळला नवजात बालकाचा मृतदेह - newborn deadbody gandhisagar lake umred
बाळाचे वय अवघे दोन ते तीन दिवस आहे. प्रेम प्रकरणातून या बाळाचा जन्म झाला असावा आणि नंतर त्याच्या आईने त्याला तलावात फेकून पोबारा केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
![उमरेड शहरातील गांधीसागर तलावात आढळला नवजात बालकाचा मृतदेह मृत बालकाचा मृतदेह](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8779135-thumbnail-3x2-op.jpg)
मृत बालकाचा मृतदेह
मृत बालकाचा मृतदेह
बाळाचे वय अवघे दोन ते तीन दिवस आहे. प्रेम प्रकरणातून या बाळाचा जन्म झाला असावा आणि नंतर त्याच्या आईने त्याला तलावात फेकून पोबारा केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्या बाळाची नाळसुद्धा पडलेली नव्हती. दरम्यान, या घटनेची माहिती उमरेड शहरात वाऱ्या सारखी पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. उमरेड पोलिसांनी बाळाच्या आईविरुद्ध गुन्हा नोंद करून तिचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा-कोरोना लॅबकडून ICMRच्या दिशानिर्देशाचे उल्लंघन; मनपा आयुक्तांनी बजावल्या नोटिसा