नागपूर -कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करा. या मागणीसाठी नागपुरातील कृषी विद्यापीठ परिसरात कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. काळी फित लावून या आंदोलनाला आजपासून (मंगळवार) सुरुवात करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठातील चारही महाविद्यालयात हे आंदोलन मागणी मान्य होईपर्यंत सुरू राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. याशिवाय कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या योजनाही शासनाने लागू कराव्यात अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
सातव्या वेतन आयोगासाठी कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Punjabrao Agricultural University
कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करा. या मागणीसाठी नागपुरातील कृषी विद्यापीठ परिसरात कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. काळी फित लावून या आंदोलनाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
सातवा वेतन आयोग राज्यभरात लागू करण्यात आला आहे. मात्र कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना अद्याप सातवा वेतन आयोग का लागू करण्यात आला नाही? असा सवाल करत कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे कृषी महाविद्यालयातील कर्मचारी वर्गालाही सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. ही प्रमुख मागणी यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांंतर्गत येणाऱ्या चारही कृषी महाविद्यालयात हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान 1 नोव्हेंबरपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून, त्यानंतर लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी कर्मचाऱ्यांनी दिली.