महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ शुद्धीकरणाची कृती अशोभनीय; देवेंद्र फडणवीसांची टीका - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर ते ठिकाण शिवसैनिकांनी शुद्ध केलं यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ज्या लोकांनी हे केलं त्या लोकांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेली नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे. एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

By

Published : Aug 20, 2021, 1:13 PM IST

नागपूर- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर ते ठिकाण शिवसैनिकांनी शुद्ध केलं यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ज्या लोकांनी हे केलं त्या लोकांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेली नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे. एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला ही घटना शोभणारी नाही.

बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ शुद्धीकरणाची कृती अशोभनीय

काल आम्ही प्रश्न उपस्थित केला की ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता आज तीच शिवसेना त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेली आहे. आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवून बाळासाहेबांच्या समाधीवर जर कुणी जात असेल तर ती समाधी अपवित्र झाली असे सांगतात. हे कितपत योग्य आहे? मला असं वाटतं की ही कृती अतिशय अयोग्य आहे.

हे तर केंद्राच्या नावाने कावीळ झालेले लोकं-

प्रत्येक विषयावर केंद्राच्या नावावे बोंब करण्याची सवय विरोधकांना झाली आहे. एकाप्रकारे केंद्राच्या नावाने कावीळ झालेले हे लोकं आहेत. ज्या विषयाचा केंद्राशी काहीही संबंध नसतो त्यासाठी सुद्धा केंद्रावर टीका करण्यात ते धन्यता मानतात. बैलांच्या शर्यतीवर बंदी लावण्याचा निर्णय झाला तेव्हा आम्ही महाराष्ट्र सरकार मध्ये होतो. आम्ही बंदी हटवण्यासाठी कायदा तयार केला. त्या कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यावेळी रनिंग ऍबिलिटी ऑफ बुल असा एक रिपोर्ट देखील तयार केल्यानंतर तो न्यायालयात सादर केला होता.

शिवसेनेची कामगिरी घसरली हे सांगायला रिपोर्टची गरज नाही-

पुढील वर्षी होऊ घातलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या आधी प्रज्ञा फाउंडेशन कडून नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेणारा एक अहवाल पुढे आला आहे. ज्यामध्ये शिवसेना नगरसेवकांची कामगिरी घसरल्याचे सांगण्यात आले आहे. यावर फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की हे सांगण्यासाठी प्रज्ञा फाउंडेशनच्या अहवालाची गरज नाही. शिवसेनेची घसरण सर्वांना बघायला मिळते आहे, त्यासाठी कुठल्या अहवालाची आवश्यकता नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details