महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर मेट्रोच्या 'या' स्टेशन दरम्यान १० किमी ट्रॅकसह, ८७ टक्के व्हायाडक्टचे कार्य पूर्ण

नागपूर शहराच्या महामेट्रोचे कार्य जलदगतीने सुरू आहे. या मार्गिकेवर देशातील २३१ मीटर लांबीचा ब्रिज आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आनंद टॉकीज, सिताबर्डी ते कॉटन मार्केटपर्यंत निर्माण कार्य सुरू आहे. भारतीय रेल्वेच्या ट्रॅकवरून १०० मीटरचा एक स्पॅन (३ मीटरचा एक गर्डर) या रेल्वे ट्रॅकवरून राहणार आहे. तसेच मेट्रो या मार्गिकेच्या ८७ टक्के व्हायाडक्टचे कार्य पूर्ण झाले आहे.

नागपूर मेट्रोचे 'या' स्टेशन दरम्यान १० किमी ट्रॅकचे कार्य पूर्ण
नागपूर मेट्रोचे 'या' स्टेशन दरम्यान १० किमी ट्रॅकचे कार्य पूर्ण

By

Published : Aug 28, 2020, 12:28 PM IST

नागपूर :येथीलमहामेट्रोच्या सिताबर्डी ते प्रजापती नगर कॉरीडोरचे कार्य जलदगतीने सुरू आहे. रिच-४ या मार्गिकेवर सुमारे १६ किमी (अप अँड डाऊन लाईन) मधील १० किमी एवढ्या मेट्रो मार्गावर रुळ बसविण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. या मार्गावरील निर्माण कार्यदरम्यान लावण्यात आलेले बहुतेक भागातील प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असल्याने त्या भागातील बॅरिकेड्स काढण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे या मार्गिकेवर देशातील २३१ मीटर लांबीचा ब्रिज आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आनंद टॉकीज, सिताबर्डी ते कॉटन मार्केटपर्यंत निर्माण कार्य सुरू आहे. भारतीय रेल्वेच्या ट्रॅकवरून १०० मीटरचा एक स्पॅन (३ मीटरचा एक गर्डर) या रेल्वे ट्रॅकवरून राहणार आहे. तसेच मेट्रो या मार्गिकेच्या ८७ टक्के व्हायाडक्टचे कार्य पूर्ण झाले आहे.

नागपूर मेट्रोचे 'या' स्टेशन दरम्यान १० किमी ट्रॅकचे कार्य पूर्ण

सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ८.३० किमीच्या या मार्गावर एकूण ०९ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहेत. ज्यामध्ये कॉटन मार्केट, नागपूर रेल्वे स्टेशन, दोसर वैश्य चौक, अग्रसेन चौक, चितार ओळी, टेलीफोन एक्सचेंज चौक, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौक, प्रजापती नगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. नागपुरच्या पूर्व आणि पश्चिम नागपूर भागांना सेंट्रल एव्हेन्यू हा एक प्रमुख मार्ग आहे. या मेट्रो मार्गिकेला लागून गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ इत्यादी असे प्रमुख व्यापारिक क्षेत्र आहेत. वाहतुकीची सुविधा या क्षेत्राकरता महत्वाची असून, मेट्रो रेल सेवेच्या माध्यमाने निश्चितच हे पूर्ण होणार आहे. नागपूरचा सेन्ट्रल एव्हेन्यू परिसर व्यावसायिक स्वरूपाचा असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन येथून होते.

नागपूर शहराचा विस्तार होत असतांना या मार्गवरील वाहतूक देखील सातत्याने वाढली. बाजारपेठ वाहतुकीच्या गर्दीमुळे प्रकल्प राबवतांना मेट्रोने पुरेपूर काळजी घेतली आहे. या मार्गिकेवरील प्रवासी सेवा सुरू झाल्यावर मेयो हॉस्पिटल, रेल्वे स्थानक, कॉटन मार्केट, इतवारी बाजारपेठ इत्यादी ठिकाणी जाणे सोईस्कार ठरणार आहे.

आतापर्यंत झालेल्या कार्याची अधिकृत आकडेवारी पुढीलप्रमाणे :

पाईल - १२८४ पैकी १२८४, पाईल कॅप २५० पैकी २५०, पियर २६७ पैकी २५३, पियर कॅप २३१ पैकी २१६, पियर आर्म ४५ पैकी ४५, ट्रॅक आर्म ४४ पैकी ४४, पोर्टल ३३ पैकी ०८, सेग्मेंट कास्टिंग २३९३ पैकी २३९३, स्पॅन इरेव्क्शन २४९ पैकी २३०, क्रॅश बॅरियर फिव्कसिंग (पियर प्रोटेक्शन) २५० पैकी २४३, मीडियन फिक्सिंग २४९ पैकी १११ असून असून मेट्रोच्या गर्डर लाँचिंगचे तसेच या मार्गावरील एनएचआयच्या डबल डेकर उड्डानपुलाचे कार्य देखील प्रगतीपथावर आहे.

हेही वाचा -तुकाराम मुंढेंची बदली थांबवा; युवा सेनेची अप्पर मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details