नागपूर -एकीकडे मान्सूनसाठी ( Monsoon in India ) भारताचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या केरळमध्ये पुढील काही दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे नागपूरसह विदर्भ आणि मध्यभारतात 'नवतपा'ला ( Navatpa started in Nagpur Vidarbha and Central India ) सुरुवात झाली आहे. नवतपा म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामातील सर्वात उष्ण नऊ दिवस, या नऊ दिवसांमध्ये तापमान मोजणाऱ्या यंत्रावर पारा जरी कमी दाखवत असला तरी उत्तरेकडील अनेक राज्यांमधून वाहणाऱ्या अतिउष्ण वाऱ्यांमुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण होतो. नवतपाच्या दुसऱ्या दिवशी सर्वाधिक तापमान मालेगावमध्ये नोंदवण्यात आले आहे.
असा राहिला दुसरा दिवस :
मुंबई - 34.2
पुणे -35.6
औरंगाबाद - 34.11
नाशिक - 34.6
महाबळेश्वर - 27.2
जळगाव - 29.4
चंद्रपूर - 41.2