नागपूर - जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. आज नागपुरात ४६.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. ज्यामुळे नागपूर आजही राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. कालपेक्षा आज शून्य पूर्णांक अंश सेल्सिअस इतकी तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे.
नागपूर राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर, तापमानाचा पारा ४६.७ अंशावर - नागपूर तापमान न्यूज
नागपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. आज नागपुरात ४६.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
गेल्या आठवड्यापर्यंत ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्याने नागपूरचे तापमान ४३ अंशाच्या वर गेले नव्हते. मात्र, या आठवड्यात उन्हाने नागपूरकरांना चांगलेच धारेवर धरले आहे. शुक्रवारी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आल्यावर शनिवारी नागपूरचा पारा ४६.५ अंशावर गेला होता. आज नागपुरात ४६.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नागपूर खालोखाल चंद्रपूर ४६.६, अकोला ४६.१, वर्धा ४५.८, गोंदिया ४६.४, यवतमाळ ४५.७, ब्रम्हपुरी ४४.४, गडचिरोली ४२.८ आणि बुलढाणा येथे ४२.५ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले.