नागपूर -सीताबर्डी परिसरातील सेवासदन सक्षम शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने काल्पनिक किल्ला ( fort ) साकारला आहे. हा किल्ला ( Sakshamgad fort ) काल्पनिक असल्याने याला आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे.
भक्कम तटबंदी, बुरुज,परकोट तयार करून ( Historical heritage ) अभेद्य असा हा किल्ला तयार करण्यात आला आहे. शत्रू कितीही मोठा बलवान असला तरी, त्याला किल्ल्यात प्रवेश करतानाचं येणार नाही अशी रचना या किल्ल्याची ( students built Sakshamgad fort ) आहे.
शिक्षक, विद्यार्थ्यांनी साकारला किल्ले सक्षमगड शत्रूला रोखण्यात सक्षम असल्याने या काल्पनिक किल्याला 'सक्षमगड' ( Sakshamgad fort ) असे नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्राला शिवकालीन गडकिल्ल्यांची ऐतिहासिक वारसा ( forts in Maharashtra ) लाभला आहे.
हा ऐतिहासिक वारसा जपला जावा याकरिता दिवाळीच्या निमित्ताने गडकिल्ले साकारण्याची परंपरा ( tradition of building a fort on Diwali ) आहे. त्याला अनुसरून सक्षम शाळेच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी 'सक्षमगड' नावाचा काल्पनिक मात्र, आधुनिक किल्ला तयार केला आहे.