महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर : आता ग्रामपंचायतीचा कारभार पाहणार मुख्याध्यापक.. विद्यार्थ्यांचं नुकसान? - ग्रामपंचायतीचा कारभार मुख्याध्यापकांकडे

ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी संपावर गेल्यामुळे गावातील लोक त्रस्त आहेत. यावर तात्पुरता उपाय म्हणून नागपूर जिल्हा परिषदेचे शिक्षक, कृषी विभागातील कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांवर ग्रामपंचायतीचा कारभार सोपविण्यात आला आहे.

जिल्हा परिषद नागपूर

By

Published : Sep 11, 2019, 5:26 PM IST

नागपूर - जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आता ग्रामसेवकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी संपावर गेल्यामुळे, निवडणुकीच्या तोंडावर ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे. गावातील लोक त्रस्त आहेत. यावर तात्पुरता उपाय म्हणून नागपूर जिल्हा परिषदेचे शिक्षक, कृषी विभागातील कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांवर ग्रामपंचायतीचा कारभार सोपविण्यात आला आहे.

प्रतिनियुक्ती संदर्भातील प्रतिक्रिया

हेही वाचा -आघाडीतही 'इनकमिंग'...भाजपचे माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबतचे आदेशही काढले आहे. नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यात ७६८ ग्रामपंचायती आहे. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या संपामुळे या गावातील कामे ठप्प आहेत. ग्रामसेवकांची ती कामे आता मुख्याध्यापकांना करावी लागणार आहेत. पण शिक्षक संघटनांनी याचा कडाडून विरोध केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे देखील नुकसान होणार आहे. 'आम्ही ग्रामसेवकांच्या संपाला पाठिंबा देवू, प्रशासनाला पाठिंबा नाही,' अशीच शिक्षक संघटनांची भुमिका आहे. पण, आता शिक्षक संघटनांच्या आडमुठ्या भुमिकेमुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details