नागपूर-कोरोना संकटामुळे शाळा बंद पडल्याने आर्थिक संकट ओढावलेल्या तेलंगणामधील एक शिक्षक गांजाची तस्करी करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवशंकर किसमपल्ली असे त्या शिक्षकाचे नाव असून नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले आहे. त्यानंतर गांजाची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.
कोरोनामुळे शाळा बंद; आर्थिक संकटात सापडलेला शिक्षकच बनला गांजा तस्कर - telangana ganja-smuggling
गांजा तस्करीचे केंद्र असलेल्या तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी नागपूरमार्गे होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. रेल्वेमार्गे सर्वात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी करण्याला तस्कर प्राधान्य देतात.
आर्थिक संकटामुळे काम
तेलंगणाच्या वारंगलमधील एका शाळेत शिवशंकर शिक्षकपदावर काम करत होते. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद पडली आणि त्यांच्यसमोर आर्थिक संकट उभे राहिले. या संकटातून मार्ग काढण्यासाठी त्यांने चक्क गांजा तस्करी करून पैसे कामावण्याचा मार्ग निवडला. शिवशंकर तेलंगणा येथून गांजाची मोठी खेप घेऊन नागपूरमार्गे दिल्लीला जात होते. मात्र, याबाबतची गुप्त माहिती बेलतरोडी पोलिसांना मिळाली पोलिसांनी वर्धा रोडवर नाकेबंदी केली. आणि शिवशंकर यांच्या गाडीची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यांच्या गाडीत ९२ किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी शिवशंकर यांना अटक केली आहे.
नागपूरमार्गे गांजा तस्करीच्या अनेक घटना
गांजा तस्करीचे केंद्र असलेल्या तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी नागपूरमार्गे होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. रेल्वेमार्गे सर्वात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी करण्याला तस्कर प्राधान्य देतात. मात्र, सध्या ठराविक रेल्वे गाड्या सुरू असल्याने हे तस्कर रोड मार्गाने गांजा तस्करी करत असल्याचे देखील उघडकीस आले आहे.
हेही वाचा-विजापूर नाका डीबी पथकाकडून दोघांना अटक; अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत