नागपूर- शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात हद्दीतील बंद पडलेल्या फॉर्च्यून मॉलच्या पार्किंग मध्ये सुमारे २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. अभिषेक बघेल असे मृतक तरुणाचे नाव आहे. तो कालपासून बेपत्ता होता. यासंदर्भात वाठोडा पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार त्याच्या आईने दाखल केली होती. शुक्रवार (आज) दुपारच्या सुमारास मॉलच्या पार्किंग मध्ये एक तरुण पडलेला असलेली सूचना पोलीसांना मिळाली. सीताबर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तो मृतदेह अभिषेक बघेल याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. अभिषेक चे वडील हे गुन्हे शाखेत कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे.
नागपूर:फॉर्च्यून मॉलच्या पार्किंग मध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्य - नागपूर फॉर्च्यून मॉल तरुण मृत्य बातमी
अभिषेक बघेल या तरुणाचे वैशाली नगर भागात मोबाईल विक्रीचे दुकान आहे. तो गुरुवार दुपारपासून घरून निघाला होता. रात्री उशिरा अभिषेक घरी परत न आल्याने त्याच्या आईने वाठोडा पोलीस ठाण्यात अभिषेक हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हा पासून पोलिसांसह त्याचे नातलग आणि मित्र मंडळी त्याचा शोध घेत होते. अभिषेकचा फोन देखील बंद येत असल्याने सर्वांची चिंता वाढली होती. दरम्यान शुक्रवार(आज) दुपारच्या सुमारास फॉर्च्यून मॉलचे काही कर्मचारी पार्किंग मध्ये गेले होते.
![नागपूर:फॉर्च्यून मॉलच्या पार्किंग मध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्य अभिषेक बघेल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11074647-thumbnail-3x2-nagpur.jpg)
अभिषेकचा मृत्यू संशयास्पद
बंद पडलेल्या फॉर्च्यून मॉल च्या पार्किंग मध्ये अभिषेक चा मृतदेह आढळून आला आहे. त्या ठिकाणी कोणाचाही फारसा वावर नाही. अभिषेक च्या बाजूला त्याची दुचाकी देखील पडलेली आढळून आली आहे. अभिषेकचा मृत्यू काल झाल्याचा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे. ज्या परिस्थिती मध्ये अभिषेकचा मृतदेह आढळून आलेला आहे,त्यामुळे त्याचा खून झाला असावा. या शंकेला देखील वाव असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. पोलिसांना घटनास्थळी फारसं काही आढळलेल नाही. मात्र पार्किंग मध्ये लागलेले सीसीटीव्ही सुरू आहेत का ? याचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा-यवतमाळ; धारदार शस्त्राने वार करून तरूणाची निघृण हत्या