नागपूर -महानगर पालिकेच्या मुख्यालयात घाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मनपातील १२ कर्मचाऱ्यांना परिसरात खर्रा खाऊन थुंकण्यासाठी ही नोटीस बजावली आहे. मनपामधील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे
नागपूर : महापालिका मुख्यालयाच्या आवारात थुंकणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस - nagpur municipal corporation news
महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मनपातील १२ कर्मचाऱ्यांना परिसरात खर्रा खाऊन थुंकण्यासाठी निलंबनाची नोटीस बजावली आहे. निलंबनावेळी बांगर यांनी दोषी कर्मचाऱ्यांना 'निलंबन का करू नये' याबाबत विचारणाही केली होती.
हेही वाचा -भारतरत्न सावरकरांनाच का? गोडसेलाही द्या - मनीष तिवारी
महानगर पालिकेच्या कार्यालय परिसरात जागोजागी खर्रा खाऊन पिचकाऱ्या मरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. यासंदर्भात आयुक्तांकडे तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर बांगर यांनी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा निर्णय घेतला. निलंबनावेळी बांगर यांनी दोषी कर्मचाऱ्यांना 'निलंबन का करू नये' याबाबत विचारणाही केली होती. दरम्यान, या अजब कारवाईची चर्चा शहरात सर्वत्र रंगली आहे