महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vishwa Hindu Parishad : पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समर्थनार्थ विश्व हिंदू परिषदेचे समर्थक उतरले रस्त्यावर - विश्व हिंदू परिषद

बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांच्यातील वाद इतक्यात शमेल असे चिन्ह दिसत नाही आहेत. आवाहन, प्रति आवाहनाचा खेळ सुरू रंगत असताना आज महाराजांचे भक्त, विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते महाराजांच्या समर्थनात मैदानात उतरले आहेत.

Movement of Vishwa Hindu Parishad
विश्व हिंदू परिषदचे आंदोलन

By

Published : Jan 20, 2023, 10:56 PM IST

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समर्थनार्थ विश्व हिंदू परिषद

नागपूर :नागपूरच्या संविधान चौकात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने महाराजांच्या समर्थनात घोषणाबाजी देऊन आंदोलन करण्यात आले. पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्री हिंदुत्वाची पताका घेऊन निघाले आहे. त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखणे सुरू झाल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव जाणीवपूर्वक पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना टार्गेट करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. श्याम मानव यांनी इतर धर्मात सुरू असलेल्या रुढीपरंपरांना विरोध का केला नाही असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

आवाहन प्रति आवाहन :बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्री यांनी काल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेले आवाहन स्वीकार केले आहे. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे येण्याचं आवाहन दिले होते. यावर 'अनिस'चे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्री यांना त्यांच्यात असलेली दिव्य शक्ती नागपुरात सिद्ध करावी असे प्रति आवाहन दिले आहे. धीरेंद्र कृष्णशास्त्री यांची दिव्य शक्ती रायपूरला चालू शकते तर नागपूरला सुद्धा चालेल त्यामुळे त्यांनी नागपूरला येऊन आपला दावा सिद्ध करावा असे आवाहन श्याम मानव यांनी दिले आहे.

हाथी चले बाजार कुत्रा भोंके हजार:पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी या वादवर काल प्रतिक्रिया दिली होती,ते म्हणाले गेल्या सात दिवसांपासून ते नागपुरात राम कथा आयोजित होती. त्यादरम्यान कोणीही आव्हान दिले नाही. मात्र कथेवरून परत येताच सनातन धर्माच्या विरोधकांनी अपप्रचार सुरू केला आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपावर सुद्धा त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'हाथी चले बाजार कुत्रा भोंके हजार' असे उत्तर दिले आहे.

इथून सुरू झाला वाद : रामकथा सुरू असताना धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी अनेकांना त्यांच्या व्यासपीठावर आमंत्रित केले. त्यानंतर त्या व्यक्तीने काहीही सांगण्याच्यापूर्वी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी व्यासपीठावर आलेल्या व्यक्तीच्या जीवनातील समस्या प्रश्न एका कागदावर लिहून काढल्या. इथूनच खरा वाद सुरू झाला. बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र शास्त्रींनी 'रामकथेच्या नावाने'अंधश्रद्धेचा खेळ सुरू केला असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. श्याम मानव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर न देताचं पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्रीचा निर्धारित दौरा नऊ दिवसांच्या होता. तो दोन दिवस आधीच गुंडाळून नागपुरातुन काढता पाय घेतला असे आरोप सुरू झाले.

काय आहे नेमके आरोप :मध्यप्रदेशच्या छतरपूर येथील बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्रीच्या नावाची केवळ भारताचं नाही तर जगभरात मोठी चर्चा आहे. नागपुरात रामकथेच्या नावाने धीरेंद्र शास्त्री यांनी जादूटोणा आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे काम केल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी केला. 'दिव्य दरबार' आणि 'प्रेत दरबार'च्या नावाखाली जादूटोण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. या शिवाय देव-धर्माच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट, फसवणूक,पिळवणूक होत असून, महाराजांवर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पोलिसांकडे केली आहे.

काय म्हणतात आता श्याम मानव :धीरेंद्र कृष्णशास्त्री यांनी चॅलेंज स्वीकारले आहे. पण याला चॅलेंज स्वीकार करणे म्हणत नाही. चॅलेंज सगळ्या अटी कागदावर लिहिलेल्या आहेत. एका वैज्ञानिक पद्धतीने दिलेले चॅलेंज आहे. याची संपूर्ण प्रक्रिया ही फ्रॉड अँड प्रूफ कंडिशनखाली पार पाडावी लागते. एका सुरक्षित वातावरणामध्ये हे चॅलेंज पार पडलं जाईल. महाराजांच्या दरबारामध्ये ते शक्य नाही. महाराजांनी नागपूरमध्ये यावं नागपूरमध्ये सगळ्या पत्रकारांसमोर एका तटस्थ पंच कमिटी समोर या आव्हानाची प्रक्रिया पार पाडली जाईल.

महाराजांना दहा लोकांची माहिती उघड करायची आहे :महाराजांनी दावा केला त्यानुसार त्यांच्या समोर ऐनवेळी दहा माणसं सादर केले जातील. त्यांची नावं, वय त्यांचं वडिलांचे नाव, फोन नंबर धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांनी सांगावे. तश्या पद्धतीचे दावे त्यांनी त्यांच्या दिव्य दरबार केले आहेत. ते व्हिडिओज उपलब्ध देखील आहेत.

कपाटात काय ठेवलं आहे ते ओळखा :याशिवाय आपल्या भक्ताच्या घरामध्ये जाऊन कोणत्या रूम मध्ये कोणत्या कपाटात काय ठेवलेला आहे हे देखील ओळखतात. मग, शेजारी एका रूममध्ये दहा वस्तू ठेवल्या जातील त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होत राहील. त्या वस्तू त्यांनी ओळखून दाखवायचे आहे. ही प्रक्रिया दोनदा पार पाडली जाईल पहिल्यांदा ते 90% सत्य ओळखावं लागेल. पहिल्यांदा ते 90% सत्य सांगू नाही शकले त्यांनी इच्छा व्यक्त केली तर, पाच दिवस नंतर दुसऱ्यांना ही प्रक्रियेवर पाडली जाईल असं श्याम मानव यांनी स्पष्ट केलं आहे.

तीस लाखांसाठी तीन लाख भरावे लागतील :आम्ही दिलेल्या आवाहनानुसार तीस लाख रुपयांचे पारितोषिक हवे असेल, तर तीन लाख रुपये डिपॉझिट ठेवावे लागतील. त्यांना जर पारितोषिक नको असेल तर केवळ दिव्य शक्ती सिद्ध करण्यासाठी ते पुढे येऊ शकतात. तरीही आम्ही या संपूर्ण प्रक्रियेचा आयोजन करू. मात्र, डिपॉझिट भरल्यानंतर ते आपला दावा सिद्ध करू शकले नाहीत तर डिपॉझिट रक्कम अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बँक खात्यात जमा होईल असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

फ्रॉड अँड प्रूफ कंडिशन:दिव्य शक्तीचा दावा ते नेहमीचं करत असतात. त्यांचा हाचं दावा सिद्ध करायचा असले तर, फ्रॉड अँड प्रूफ कंडिशन खालीच खाली करता येईल. त्यासाठी पंडित धिरेंद्र कृष्णा शास्त्रींनी त्यांच्या सोयीने नागपुरात यावं संपूर्ण व्यवस्था ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून केली जाईल असे देखील श्याम मानव यांनी स्पष्ट केला आहे.

रायपूर नाही तर नागपुरात दावा सिद्ध करा : छत्तीसगड राज्यातील रायपूरमध्ये 20,21 जानेवारीला बागेश्वर धामचा दिव्य दरबार भरवला जाणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना दरबारात आमंत्रित करण्यात आले आल्याची माहिती पंडित धीरेंद्र कुमार शास्त्रींनी दिली आहे. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून ही शक्यता फेटाळून लावली आहे. दावा सिद्ध करण्यासाठी एका त्रयस्थ ठिकाणची गरज आहे. नागपूर हे पोल खोल शहर असल्याने त्यांनी नागपुरात येऊन आपला दावा सिद्ध करावा.

तर मी त्यांच्या पायावर डोक ठेवेल :फ्रॉड अँड प्रूफ कंडिशन अंतर्गत पंडित धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांनी दिव्यशक्ती सिद्ध करून दाखवल्यास मी स्वतः म्हणजेचं श्याम मानव हे त्यांच्या पायावर डोकं ठेवून जाहीर माफी मागेल. 40 वर्षात जी संस्था अंधश्रद्धा निर्मूलन समिती उभी केलेली आहे ती क्षणात बंद करेल असे देखील ते म्हणाले आहेत.

महाराजांवर पालकुटे असल्याचा आरोप :बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्री हे पालकुटे आहेत. त्यांनी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर आयोजित रामकथा नियोजित वेळेत पूर्ण न करता दोन दिवस आधीचं गुंडाळून पळ काढल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता. तेव्हापासूनचं पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री, अंधश्रद्धा निर्मूलन समितीत सुरू झालेला वाद रोज नवं-नवीन वळण घेत आहे.

नागपुरात रामकथेचं आयोजन झालं होतं :गेल्या आठवड्यात म्हणजेच ५ ते १३ जानेवारी दरम्यान नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्री यांच्या रामकथा पाठचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोशल मीडियावरील अनेक प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचा मुक्काम नागपुरात नऊ दिवस असल्या त्यांच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी आणि रामकथा ऐकण्यासाठी देशाच्या प्रत्येक भागातून लोक आले होते. सर्वाधिक गर्दी तर मध्यप्रदेशातून आलेल्या लोकांची होती. परंतु १३ जानेवारी ऐवजी ११ जानेवारीलाचं कथेचा समारोप करण्यात आला.

'अनिस'चे आवाहन धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना स्वीकार :अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना आवाहन दिले आहे. त्यांनी आमच्यामध्ये दैवी चमत्कारी दरबार आयोजित करावा सर्व सत्य सांगाल तर आम्ही त्यांना 30 लाख रुपये भेट देऊ. त्यांचे आवाहन धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी स्वीकार केले आहे.

रामकथेला भाजप नेत्यांची,मंत्र्यांची प्रमुख उपस्थिती :बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र शास्त्रींच्या 'रामकथेला भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश आहे.

हेही वाचा -Bageshwar Sarkar Divya Darbar: बागेश्वर धामच्या दिव्य दरबारात नेमकं काय झालं? बाबांनी दाखवला चमत्कार अन् महिला म्हणाली..

ABOUT THE AUTHOR

...view details