महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shyam Manav security increased :  तुमचा दाभोळकर करू.. धमकीनंतर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ - Nagpur news

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांच्या सुरक्षित मोठी वाढ करण्यात आलेली आहे. बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि श्याम मानव यांच्यातील संघर्ष हा दिवसेंदिवस पेटत आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांबरोबरच संतांनी देखील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या पाठीशी उभे झाल्यामुळे श्याम मानव यांच्या जीवितास कुठलाही धोका उद्भवू नये, या पार्श्वभूमीवर श्याम मानव यांच्या सुरक्षित वाढ करण्यात आलेली आहे.

Shyam Manav security increased
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव

By

Published : Jan 23, 2023, 1:27 PM IST

Updated : Jan 23, 2023, 1:49 PM IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव

नागपूर :श्याम मानव यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली जात होती. मात्र, एकूणच संपूर्ण घटनाक्रमनंतर आता सुरक्षा ताफ्यात चार पोलीस कर्मचाऱ्यांसह एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वी विशेष सुरक्षा पथकाच्या दोन जवानांसह दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा सुरक्षित समावेश असायचा, मात्र आता ही संख्या सातवर गेलेली आहे.


आव्हान- प्रतिआव्हानाची लढाई :बागेश्वर धामचे मुख्य पुजारी पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्रीना श्याम मानव यांनी थेट आव्हान दिले होते. त्यामुळे काही दिवसांपासून आव्हान- प्रतिआव्हानाची लढाई ही वाढतच जात आहे. सध्या श्याम मानव हे नागपूरच्या रवी भवन येथील कॉटेज क्रमांक 16 मध्ये मुक्कामी आहेत. ते पुढील काही दिवस नागपूरतच राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्यानंतर काही उपाय योजना करण्यात आल्या आहेत. श्याम मानव यांना भेटण्यास येणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस करून चौकशी केली जात आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान :धीरेंद्र शास्त्रींनी किमान दहा लोकांवर चमत्कार सिद्ध केल्यास ३० लाख देऊ असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून देण्यात आले होते. त्यानंतर पंडित धीरेंद्र कुमार शास्त्रीं यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन स्वीकारले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना दरबारात आमंत्रित करण्यात आल्याची माहिती पंडित धीरेंद्र कुमार शास्त्रींनी दिली होती. दिव्य शक्तीचा दावा शास्त्री नेहमीच करत असतात. त्यांचा हाच दावा सिद्ध करायचा असले तर फ्रॉड अँड प्रूफ कंडिशन खालीच खाली करता येईल. त्यासाठी पंडित धिरेंद्र कृष्णा शास्त्रींनी त्यांच्या सोयीने नागपुरात यावे. त्यांची संपूर्ण व्यवस्था ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून केली जाईल, असे देखील श्याम मानव यांनी स्पष्ट केले होते.

बाबांवर आरोप काय? : मध्यप्रदेशच्या छतरपूर येथील बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्रीच्या नावाची केवळ भारतातच नाही तर जगभरात मोठी चर्चा आहे. नागपुरात रामकथेच्या नावाने धीरेंद्र शास्त्री यांनी जादूटोणा आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे काम केल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला होता. 'दिव्य दरबार' आणि 'प्रेत दरबार'च्या नावाखाली जादूटोण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. या शिवाय देव-धर्माच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट, फसवणूक, पिळवणूक होत असून, महाराजांवर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पोलीसांकडे केली आहे. तर श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना आव्हान दिले होते. त्यांनी आमच्यामध्ये दैवी चमत्कारी दरबार आयोजित करावा, सर्व सत्य सांगाल तर आम्ही त्यांना 30 लाख रुपये भेट देऊ.


हेही वाचा :Dhirendra Krishna Shastri In Nagpur : धीरेंद्र कृष्णशास्त्री नागपुरात येणार; श्याम मानवांचे आव्हान स्वीकारणार

Last Updated : Jan 23, 2023, 1:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details