नागपूरSunil Kedar Jail Term :नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रोखे घोटाळ्याप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा झाल्यानंतर सुनील केदार यांची वैद्यकीय तपासणी दरम्यान तब्येत बिघडली होती. (Bank Scam Case) त्यामुळे त्यांना मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वी त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यानंतर त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. (Sunil Kedar Sentence)
आमदारकी झाली रद्द :नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रोखे घोटाळ्याप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा झाल्यानंतर सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी कायद्याच्या नुसार दोन वर्षांपेक्षा अधिक जर शिक्षा न्यायालयाने आमदार किंवा खासदाराला सुनावली असेल तर त्या लोकप्रतिनिधीचे सदस्यत्व रद्द केले जाते. त्या कायद्यानुसार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली.
काय आहे रोखे घोटाळा प्रकरण :२००१-२००२ साली नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री सुनील केदार असताना होमट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमनी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड कोलकाता, सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड कोलकाता, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस अहमदाबाद आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस मुंबई यांच्याकडून बँकेच्या रकमेतून सरकारी रोखे (शेयर्स) खरेदी करण्यात आले होते. शेअर्स खरेदी करणारी खासगी कंपनी दिवाळखोर झाली. त्यानंतर कंपन्यांनी सरकारी शेअर्सही दिले नाही आणि बँकेची रक्कमही परत केली नाही, असा आरोप आहे. सहकार विभागाचा कायद्यातील नियम आणि तरतुदींचे उल्लंघन करत ही रक्कम गुंतवण्यात आली होती. या कंपन्या बुडाल्याने शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. त्यामुळे सुनील केदार तसंच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते.