नागपूर- जिल्हा परिषदेसाठी आज नागपूरमध्ये मतदान पार पडत आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या ५८ आणि पंचायत समितीच्या ११६ जागांसाठी आज मतदान होत आहे. यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी त्यांच्या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला. तसेच त्यांनी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचीच सत्ता येणार, ही काळ्या दगडावरील रेष, असा विश्वास व्यक्त केला.
सुनिल केदार, पशुसंवर्धन मंत्री हेही वाचा - 2018 च्या तुलनेत गुन्ह्यात 10 टक्यांची घट - पोलीस आयुक्त
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात झालेल्या दणदणीत पराभवाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषदेत पुन्हा सत्तेत येण्यासाठी अधिक जोर लावताना दिसत आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत उत्साह आहे.
हेही वाचा - खातेवाटपानंतर विजय वडेट्टीवार नाराज?; दोन्ही दिवशी नागपूर दौरा रद्द
यावेळी बोलताना केदार म्हणाले, मात्री ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी केली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत देखील ताकद पणाला लावली होती. मात्र, जनतेने मतपेटीतून आपला कौल आघाडीला दिला असे देखील केदार म्हणाले. मतदानामुळे आज ते कॅबीनेटच्या बैठकीत जाणार नाहीत असे देखील त्यांनी सांगितले. आज १८२८ मतदान केंद्रावर मतदान पार पडले. जिल्हा परिषदेच्या ५८ जगांसाठी २७० उमेदवार आपले भाग्य आजमावणार आहेत, तर १३ तालुक्यातील पंचायत समितीच्या ११६ जगांसाठी ४९१ उमेदवार रिंगणात आहेत. आता देखील काँग्रेस-राष्ट्रवादीचीच सत्ता येणार, असा विश्वास व्यक्त केला.