नागपूर -लोखंडी सळई जर डोक्यातून आरपार गेली असेल तर माणसाचे जगणे अशक्यच... मात्र देव तारी त्याला कोण मारी, असाच प्रकार नागपुरात बघायला मिळाला आहे. एका रोजंदारीच्या मजुराला डोक्यात आरपार सळई घुसूनही जीवनदान मिळाले आहे.
देवतारी त्याला कोण मारी; डोक्यात आरपार सळई घुसूनही... - surgery
नागपूरमध्ये विहिरीचे काम करत असताना संजय बाहे या मजुराच्या डोक्यात एक सळई आरपार गेली.
नागपूरमध्ये विहिरीचे काम करत असताना संजय बाहे या मजुराच्या डोक्यात एक सळई आरपार गेली. यावेळी संजय काम करत असताना तो उभ्या सळईवर पडला. सळई चक्क त्याचा डोक्यात आरपार शिरली. अशा परिस्थितीत माणसाचा जीव वाचणे कठीणच असते. मात्र, या भयावय घटनेत देखील संजयला जीवनदान मिळाल आहे. नागपुरातील प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. प्रमोद गिरी आणि त्यांच्या चमूने शर्तीचे प्रयत्न करुन अडीच तासाच्या शस्त्रक्रियेनंतर मेंदूतून सळई बाहेर काढली आणि बालाघाटच्या मजुरावर खासगी रुग्णालयात यशस्वी उपचार झाले.