नागपूर- जेएनयू विद्यापीठात शुल्कवाढ आणि शिक्षणाचे खाजगी करण करण्याच्या विरोधात नागपूरचे विद्यार्थी देखील रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये विविध विद्यार्थी संघटनांनी सहभाग दर्शविला. संपूर्ण देशात होणाऱ्या शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण आणि शुल्कवाढीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.
नागपुरात शिक्षणातील शुल्कवाढ, खाजगीकरणाच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर - fees of colleges in nagpur
संपूर्ण देशात होणाऱ्या शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण आणि शुल्कवाढीच्या विरोधात विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन नागपुरात करण्यात आले.
नागपुरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दृश्ये
हातात तिरंगा घेऊन यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. शिष्यवृत्ती नियमित सुरू करावी. शुल्क वाढीसाठी काही नियम असले पाहिजेत. तसेच शिक्षणाचे खाजगीकरण बंद झाले पाहिजे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.