नागपूर -शैक्षणिक शुल्क वाढीसंदर्भात जवाहरलाल नेहरू विद्यपीठात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे विद्यार्थी देखील रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात विविध विद्यार्थी संघटनांनी आपला सहभाग नोंदवला.
जेएनयूतील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ नागपुरात विद्यार्थी रस्त्यावर
फीवाढ तसेच संपूर्ण देशात सुरू असलेले शिक्षणाचे खासगीकरण थांबवण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. त्यासोबतच, मानव संसाधन मंत्रालयाने १०% निधी विद्यार्थ्यांसाठी खर्च करावा आणि शिष्यवृत्ती नियमित सुरू करावी, या मागण्यादेखील विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
जेएनयूतील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ नागपुरात विद्यार्थी रस्त्यावर
हेही वाचा -मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च समितीची जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी घेतली भेट
फी वाढ तसेच संपूर्ण देशात सुरू असलेले शिक्षणाचे खासगीकरण थांबवण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. त्यासोबतच, मानव संसाधन मंत्रालयाने १०% नीधी विद्यार्थ्यांसाठी खर्च करावा आणि शिष्यवृत्ती नियमित सुरू करावी, या मागण्यादेखील विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.