नागपूर- शिवाजीनगर परिसरातील मारोतराव मुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली आहे. ३२ विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. विषबाधा झालेले विद्यार्थी इयत्ता ५ ते ८ व्या वर्गातील आहेत.
नागपुरात मध्यान्ह भोजनातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू - nagpur students poisoned due to mid day meal
शिवाजीनगर परीसरातील मारोतराव मुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली आहे. ३२ विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
शाळेत शालेय पोषण आहारा अंतर्गत देण्यात येणारी खिचडी खाल्ल्यानं विषबाधा झाल्याची माहिती आहे. नेहमीप्रमाणे आज दुपारी १ वाजता शगुण महिला बचत गटाकडून शाळेत खिचडी आली. नियमानुसार खिचडी इंचार्ज यांनी खिचडी चाखून बघितली आणि डबे बंद करून ठेवण्यात आले. मध्यान्ह भोजनात खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला. विद्यार्थ्यांना प्रथम प्राथमिक उपचाराकरीता शाळेजवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग लांबट यांनी दिली आहे.
हेही वाचा - पुणे विमानतळावर आढळला 'कोरोना' संशयित