नागपूर - जिल्ह्यात रुग्ण वाढ होत असताना शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी मोहीम राबवली जात आहे. यात सुपर स्प्रेडरमुळे मोठ्या इमारतीत रुग्ण वाढत असल्याचे लक्षात आल्याने विशेष मोहीम राबवत रुग्ण आढळणाऱ्या इमारतीत चाचण्या करून घेण्यात आल्या. यासोबत सध्या इमारती सील नसल्याची माहिती मनपाकडून पुढे येत आहे.
माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी हेही वाचा -नागपूरमध्ये फार्मसीतून रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रिला बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
या इमारतीत सुपर स्प्रेडरमध्ये पेपर विक्रेता, भाजीपाला, दूध विक्रेता यांना इमारतीत जाण्यास आता सोसायटीच्या वतीने बंदी करण्यात आली आहे. पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास इमारती सील केल्या जाईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात एखाद्या घरात रुग्ण आढळल्यास त्यांना घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे. यासोबत मनपाकडून गृहभेटी घेऊन विलगीकरणाच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याकडे जातीने लक्ष दिले जात आहे. यामुळे कडक निर्बंध इमारती किंवा फ्लॅट, अपार्टमेंटमध्ये लावण्यात येत आहेत.
मध्यंतरी एलआयसी कॉलनीत 20 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आल्याने त्यांचे निवासस्थान कंटेन्मेंट झोन केल्याची कारवाई करण्यात आली होती. यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातसुद्धा एकाच वेळी पाचपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आल्याने छोटे कंटेन्मेंट झोन घोषित करून निर्बंध लादण्यात आले होते. यासोबत शहरात इमारत किंवा अपार्टमेंटमध्ये रुग्ण आढळल्यास त्या अपार्टमेंटमध्ये सर्वांना कोरोनाची चाचणी बधनकारक करण्यात आली होती. कोरोना चाचणीला विरोध केल्यास पूर्ण इमारत सील करण्याचे आदेश आहे. मात्र, तशी वेळ मनपा प्रशासनावर आली नसल्याचे बोलले जात आहे. दुकाने किंवा व्यापारी प्रतिष्ठान यांनी काही नियमांचा भंग केल्यास त्यांच्यावर दंडात्मक स्वरुपात कारवाई केली जात आहे.
नागपूर जिल्ह्यातील सध्याची कोरोना परिस्थिती
नागपूर जिल्ह्यात सध्या 41 हजार 529 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये साधारण 10 ते 15 टक्के लोकं हे रुग्णालयात असून मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण हे घरात आहे. यामुळे घरात असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ऐनवेळी रुग्ण हे दवाखान्यात पोहचत असल्याने गंभीर रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. मागील सहा दिवसांत 310 जण दगावले आहेत. यात आतापर्यंत 5 हजार 438 जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा -श्रद्धानंद अनाथालयातील विद्यार्थिनींच्या निश्चयाची 'गुढी'