महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Stray Dogs Attack Video : भटक्या कुत्र्यांच्या टोळीने केला चिमुरड्यावर हल्ला; पाहा थरारक व्हिडिओ

नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनमोल नगर येथील शिवाजी पार्क परिसरात मंगळवारी आणखी एक धक्कादायक घटना घडली. यात सात भटक्या कुत्र्यांनी घरासमोर एका मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला आहे.

Stray Dogs Attack Video
भटक्या कुत्र्यांच्या टोळीने केला चिमुरड्यावर हल्ला

By

Published : Apr 13, 2023, 12:44 PM IST

Updated : Apr 13, 2023, 1:44 PM IST

नागपूर : ३ वर्षीय चिमुकल्या मुलाचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना नागपुरात घडली आहे. जितू दुबे असे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. हृदयाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली आहे. नागपुरातील वाठोडा भागातील अनमोल नगरातील शिवाजी पार्क इथे संपूर्ण नागपूर प्रमाणेच या भागात देखील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे.

नागरिकांमध्ये प्रचंड दहशत :कुत्र्यांनी नागरिकांचा चावा घेण्याच्या घटना घडल्या आहे. मात्र आता तर तीन वर्षाच्या चिमुकल्यावर कुत्र्यांच्या टोळीने एकसाथ हल्ला चढवत अक्षरशः त्याचे लचके तोडले. त्याची आई आपल्या बाळाचा टाहो ऐकून बाहेर आल्याने, मोठा अनर्थ टळला. या घटनेने परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. मनपा प्रशासनाने ताबडतोब या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मोकाट तसेच भटक्या कुत्र्यांना पकडणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या पथकाला कुणी व्यक्तींनी अडथळा निर्माण केल्यास संबंधीत विरुध्द प्रचलित कायदेयान्वये गुन्हा नोंद करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



कुत्र्यांची वाढती जनसंख्या चिंताजनक :आजच्या स्थितीत नागपूर शहरात सुमारे एक लाख भटके कुत्रे आहेत. २०१८ ही संख्या ८१ हजार झाली होती. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने ठोस पावले उचलले नाहीत, त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वेगात वाढत आहे. मोकाट कुत्र्यांना रस्त्यावर खाऊ घालण्याचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मोकाट श्वानांना रस्त्यावर अन्न खाऊ घालणाऱ्या सर्व इच्छुक नागरिकांनी, प्राणीप्रेमी संस्था आणि संघटनांनी नागपूर महानगरपालिकेकडे अर्ज सादर कारण्याची सूचना केली होती. मोकाट श्वानांना ज्या ठिकाणी अन्न खाऊ घालत आहे त्या ठिकाणाबाबत सविस्तर माहिती, अन्न खाऊ घालण्याची वेळ, अन्न खाऊ घालत असलेल्या मोकाट श्वानांची अंदाजित संख्या इत्यादी सविस्तर माहिती अर्जामध्ये नमूद करावी, अशी सूचना करण्यात आली होती.

हेही वाचा : Terror Of Dogs : दिल्लीत भटक्या कुत्र्यांनी घेतला दोन सख्या भावांचा जीव! नागरिकांमध्ये दहशत

Last Updated : Apr 13, 2023, 1:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details