महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'विरार रुग्णालय आगीसंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य असंवेदनशील' - राजेश टोपेंनी केलेल्या वक्तव्यावर फडणविसांची प्रतिक्रिया

आरोग्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य असंवेदनशील असल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच या दुखद घटनांमध्ये अश्या प्रकारची प्रतिक्रिया देणे, हे अयोग्य असल्याचेही ते म्हणालेत.

devendra fadnavis
विरार रुग्णालय आगीसंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य असंवेदनशील

By

Published : Apr 23, 2021, 2:40 PM IST

Updated : Apr 23, 2021, 3:26 PM IST

नागपूर - विरार येथील आगीच्या घटनेवर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी 'अश्या घटना काही नॅशनल न्यूज नाही', असे वक्तव्य केले होते. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य असंवेदनशील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते कुठल्या मानसिकतेत म्हणाले हे मला माहित नाही. पण आपण संवेदनशील असले पाहिजे. या दुखद घटनांमध्ये अश्या प्रकारची प्रतिक्रिया देणे हे अयोग्य असल्याचेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया

मृतांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना -

विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये लागलेली आग आणि त्यातील घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. अगोदरच कोरोनामुळे वातावरण भयभीत झाले आहे. असे असताना सततच्या घटननेनंतर मुख्यमंत्री चौकशी करू, फायर ऑडिट करू, असे म्हणत असतात. मात्र, कारवाई होताना दिसत नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले. कोविडमुळे रुग्णालयांवर ताण वाढतो आहे. मात्र, रुग्णालयानेदेखील शासनाला मदत केली पाहिजे. भंडारा, ईशान्य मुंबई, नाशिक, विरार या सगळ्या भयानक घटना आहे. अनकेजन मृत्यूमुखी पडले. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत, आता इतर रुग्णांची योग्य देखभाल करण्याकरिता योग्य पाऊल उचलले पाहिजे, अशा सुचनाही त्यांनी केल्या.

रात्री तीनच्या सुमारास लागली होती आग -

नाशिकमधील ऑक्सिजन लीकची दुर्दैवी घटना ताजी असतानाच, विरारमध्ये एका रुग्णालयाला आग लागल्याची घटना समोर आली. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये ही दुर्घटना घडली. रात्री तीनच्या सुमारास रुग्णालयाच्या आयसीयू विभागामध्ये ही आग लागली होती. याठिकाणी १७ रुग्णांवर उपचार सुरू होते. यांपैकी १३ रुग्ण दगावल्याची माहिती रुग्णालयाचे संचालक दिलीप शहा यांनी दिली. इतर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, अतिदक्षता विभागातील एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - 'ही काही नॅशनल न्यूज नाही'; राजेश टोपे यांचे बेजबाबदार विधान

Last Updated : Apr 23, 2021, 3:26 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details