नागपूर-भंडारा येथील शासकीय रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत १० नवजात बालकांचा दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्याचे अनेक मंत्री आणि विरोधी पक्षनेते घटनास्थळाला भेट देत आहेत. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील याड्रावरकर आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील नागपूर येथून भंडारा येथे जाण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यापूर्वी प्रथमदर्शनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे ते म्हणाले. घटनास्थळी भेट दिल्यानंतर नेमक्या कारणांची माहिती देणार असल्याचे ते म्हणाले.
प्रथमदर्शनीत भंडारा जिल्हा रुग्णालयाची आग शॉर्ट-सर्किटमुळे - आरोग्य राज्यमंत्री
भंडारा येथील शासकीय रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत १० नवजात बालकांचा दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्याचे अनेक मंत्री आणि विरोधी पक्षनेते घटनास्थळाला भेट देत आहेत.
प्रथमदर्शनीत भंडारा जिल्हा रुग्णालयाची आग शॉर्ट-सर्किटमुळे - आरोग्य राज्यमंत्री
तर आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की एसीमुळे या संदर्भात सखोल चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
Last Updated : Jan 9, 2021, 5:34 PM IST