महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना विषाणूमुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात दडलेला "शेफ" आला पुढे - corona virus pandemic

धकाधकीच्या जीवनातून मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनोखा पर्याय अवलंबला आहे. त्यांनी चक्क स्वयंपाकघराचा ताबा घेत सर्वांसाठी खमंग पाककृती बनवली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख
गृहमंत्री अनिल देशमुख

By

Published : Mar 22, 2020, 10:25 PM IST

Updated : Mar 22, 2020, 10:53 PM IST

नागपूर - कोरोना विषाणूविरोधातील लढाईत प्रत्येकाने स्वतःला 'होम क्वारन्टाईन' केले आहे. यात सामान्य नागरिकांपासून ते मंत्री आणि अति-महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. धकाधकीच्या जीवनातून मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनोखा पर्याय अवलंबला आहे. त्यांनी चक्क स्वयंपाकघराचा ताबा घेत सर्वांसाठी खमंग पाककृती बनवली आहे.

कोरोना विषाणूमुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात दडलेला "शेफ" आला पुढे

'होम क्वारन्टाईन' परिस्थितीत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील यांनी सर्व कार्यक्रम रद्द करून स्वतःला घरीच रमवून घेतले आहे. या काळात करायचे तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचे उत्तरही देशमुख यांनी शोधून काढले आहे. आता वेळच मिळाला आहे तर, त्यांनी आज चक्क स्वयंपाक खोलीचा ताबा घेऊन सर्वांसाठी खमंग भाजी तयार करून सुनांसह सौ. देशमुख आणि कुटुंबातील सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला.

रोजच्या भरगच्च कार्यक्रमातून वेळ मिळत नसल्याने कुटुंबीयांना वेळ देता येतच नाही. मात्र, कोरोनामुळे का होई ना अनिल देशमुख आता पुढील काही दिवस घरी असणार आहे. या काळात ते आपल्या आवडी-निवडी जपणार आहेत. आज त्यांनी तशी सुरवात देखील केलेली आहे. पहिल्या दिवशी देशमुख स्वयंपाक खोलीत रमले. त्यांनी संपूर्ण कुटुंबियांकरीता भाजी तयार केली.

'कोण म्हणतो घरी बसून लढता येत नाही? आज जनता कर्फ्युच्या निमित्ताने घरी राहून पहिल्यांदा स्वयंपाक करण्याचा योग आला. आपणही दिवसभर घरी बसून देशाला सहकार्य करावे, ही विनंती त्यांनी केली आहे. देशाच्या सीमेवर लढणारा सैनिक आहेत पण कोरोना विरोधातील युद्धात घरी बसणे, हाच लढाऊ सैनिकाचा धर्म समजावा', असे ते म्हणाले.

हेही वाचा - कोरोनाचा हायव्होल्टेज इफेक्ट, वीजबिल आकारणी पद्धत बदलणार

हेही वाचा - हातावर क्वारंटाइनचा शिक्का.. कोरोना संशयिताला रेल्वेतून खाली उतरवले

Last Updated : Mar 22, 2020, 10:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details