नागपूर - सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशातच महिला सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकार अतिशय कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. महिलांच्या सुरक्षेबाबत महाराष्ट्र तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
'महिला सुरक्षेबाबत कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा करणार' - महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदा करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती
सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशातच महिला सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकार अतिशय कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
!['महिला सुरक्षेबाबत कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा करणार' state government will be rigorous law for women safety](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5452212-785-5452212-1576939554158.jpg)
१६ डिसेंबरपासून सुरु असणाऱ्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. त्यानंतर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महिला सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकार दक्ष असल्याचे म्हटले. तसेच महिला सुरक्षेच्या बाबतीत कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा राज्य सरकार करणार आहे.
आजच्या दिवशी सरकारने मोठे निर्णय घेतले.
१) शेतकऱ्यांना सरसकट २ लाखापर्यंत कर्जमाफी
२) १० रुपयांमध्ये जेवण (शिवभोजन योजना)
३) प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालय उभारणार
४) विदर्भातील प्रश्नांची सोडवणूक करणार
५) विदर्भात प्रकल्प उभारुन समृद्धी आणणार