महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात मोहदारूची तस्करी करण्यासाठी अनोखी शक्कल; एकजण ताब्यात - liquor smugglers

शहरातील सक्करदरा परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत मोह दारू जप्त केली. अवैध दारू वाहतूक करनाऱ्या आरोपी शेख हमीद शेख ईजराईल (वय ५०) याला  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नागपुरात मोहदारूची तस्करी करण्यासाठी अनोखी शक्कल; एकजण ताब्यात

By

Published : Jun 4, 2019, 7:02 PM IST

नागपूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मोहदारू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करत १ हजार ३६० लिटर मोहाची दारू जप्त केली. दारू तस्कर शक्कल लढवत टायर, ट्युबमध्ये दारू साठून तस्करी करतात. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गावालगत आलेल्या कालव्या शेजारीच हातभट्टी चालवली जाते. १०० लिटर क्षमतेच्या १७ रबरी ट्युबमध्ये रासायनिक युक्त मोहदारूची ग्रामीण भागातून शहरात तस्करी केली जात होती.

नागपुरात मोहदारूची तस्करी करण्यासाठी अनोखी शक्कल; एकजण ताब्यात

शहरातील सक्करदरा परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत मोह दारू जप्त केली. अवैध दारू वाहतूक करनाऱ्या आरोपी शेख हमीद शेख ईजराईल (वय ५०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमानात हात भट्यावर दारू तयार केली जाते. मोह फुलाच्या दारूमध्ये रसायनांचा देखील उपयोग केला जातो.

ABOUT THE AUTHOR

...view details