महाराष्ट्र

maharashtra

'थकबाकी असलेले वेतन द्या, अन्यथा आंदोलन करू,' एसटी कर्मचार्‍यांचा इशारा

By

Published : Nov 2, 2020, 10:40 PM IST

कोरोनाचे कारण देत राज्य शासनाकडून गेल्या ४ महिन्यापासून राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहेत. आधीच कोरोनामुळे त्रस्त असलेला कर्मचारी पगार नसल्यामुळे चांगलाच हतबल झाला आहे. त्यामुळे किमान थकीत असलेला वेतन तरी द्या. अशी मागणी यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

nivedan
निवेदन

नागपूर - गेल्या ४ महिन्यापासून थकीत असलेले वेतन आणि शासनाने लागू केलेले वाढीव वेतन लागू करा. या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शिवाय थकीत असलेले वेतन वेळेवर न दिल्यास येत्या ९ नोव्हेंबर पासून आंदोलन करू, असा ईशाराही यावेळी देण्यात आला. महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना, नागपूरच्या वतीने हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

कोरोनाचे कारण देत राज्य शासनाकडून गेल्या ४ महिन्यापासून राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहेत. आधीच कोरोनामुळे त्रस्त असलेला कर्मचारी पगार नसल्यामुळे चांगलाच हतबल झाला आहे. त्यामुळे किमान थकीत असलेले वेतन तरी द्या, अशी मागणी यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. शिवाय शासनाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या योजना, शासकीय भत्ते हे अजूनही कागदावरच असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे. या सर्व स्थितीमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचेही या निवेदनातून सांगण्यात आले आहे. या समस्या घेऊन या आधीही मंत्री सुनिल केदार यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यावर त्यांनी लवकरच तोडगा काढू असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही कोणताही निकाल न आल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. सोबतच समोर दिवाळी सारखा सण येत आहे. त्यामुळे किमान दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तरी थकीत असलेले वेतन देऊन कर्मचाऱ्यांना न्याय द्या, अशी मागणीही यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. मात्र, या सर्व परिस्थितीवर नागपूर परिवहन विभागाच्या नियंत्रकांनी सांगितले की, वेतन बाबतचे सर्व निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. त्यामुळे विभागीय स्तरावर या बाबत भाष्य करता येणे शक्य नसल्याची प्रतिक्रिया नियंत्रकांनी दिली आहे. त्यामुळे
एकंदरीतच सद्यस्थिती पाहता येत्या ८ नोव्हेंबरपर्यंत थकीत वेतन व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या योजना शासनाने लागू केल्या नाही. तर ९ नोव्हेंबर पासून आंदोलन करू, असा इशाराही यावेळी परिवहन कर्मचारी संघटनांनी निवेदनातून दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details