महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात कोविड हॉस्पिटल सुरू, 'या' सुविधा देणारे मध्य भारतातील पहिलेच रुग्णालय - covid hospital starts in nagpur

नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या ट्रामा केअर सेंटरला सव्वा दोनशे खाटांच्या कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यात आले आहे. आयसीयूसोबतच स्वतंत्र क्ष-किरण विभाग, स्वतंत्र प्रयोगशाळा, स्वतंत्र शस्त्रक्रिया, स्वतंत्र रक्तसाठा असलेले हे मध्य भारतातील पहिले अत्याधुनिक व सर्व सोयीयुक्त कोविड रुग्णालय आहे.

नागपुरात कोविड हॉस्पिटल सुरू
नागपुरात कोविड हॉस्पिटल सुरू

By

Published : Apr 26, 2020, 11:31 AM IST

Updated : Apr 26, 2020, 12:23 PM IST

नागपूर- कोरोनाच्या रुग्णांसाठी नागपुरात विशेष कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या ट्रामा केअर सेंटरला सव्वा दोनशे खाटांच्या कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यात आले आहे. आयसीयूसोबतच स्वतंत्र क्ष-किरण विभाग, स्वतंत्र प्रयोगशाळा, स्वतंत्र शस्त्रक्रिया, स्वतंत्र रक्तसाठा असलेले हे मध्य भारतातील पहिले अत्याधुनिक व सर्व सोयीयुक्त कोविड रुग्णालय आहे.

या रुग्णालयात 40 व्हेंटिलेटरसह किडनी रुग्णांसाठी डायलिसिसचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड रुग्णालयातून संसर्ग पसरू नये, याची विशेष दक्षता घेण्यात आली आहे. डॉक्टर व रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार देण्यात आले आहे. पीपीई कीट घालण्याचा व काढण्याचा कक्षही वेगळा करण्यात आला आहे. येथून हलवण्यात आलेले ट्रामा सेंटर दुसऱ्या वॉर्डात स्थलांतरीत करण्यात आले आहे.

नागपुरात कोविड हॉस्पिटल सुरू

कोविड रुग्णालयाची वैशिष्ट्ये -

1) संशयित रुग्णांसाठी 30 खाटांचा वॉर्ड

2) पॉझिटिव्ह रुग्णांसाठी 130 खाटांचा वॉर्ड

3) गंभीर रुग्णांसाठी 60 खाटांचे आयसीयू

4) 40 व्हेंटिलेटर, 3 डायलिसिस यंत्र

5)प्रत्येक बेडजवळ ऑक्सिजन व सेक्शनची व्यवस्था

6)क्ष-किरण व सिटी स्कॅन

Last Updated : Apr 26, 2020, 12:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details