महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यार्थ्यांची जात पडताळणीची प्रकरणे तातडीने निकाली काढावी - नाना पटोले - नाना पटोले जात पडताळणी

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत प्रवेशासाठी नोंदणी केल्यानंतर दिलेल्या मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर सादर करणे गरजेचे आहे. त्यामुळे समितीने तातडीने जात पडताळणी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशा सुचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या.

caste-validity-certificate
जात पडताळणीबाबत बैठक

By

Published : Jul 18, 2020, 8:22 AM IST

नागपूर- इयत्ता दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सत्रात प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्रे आवश्यक आहेत. त्यामुळे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने महत्वाची असणारी जात पडताळणी प्रमाणपत्रांची प्रकरणे तातडीने निकाली काढावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.

नागपूर येथील मुख्यमंत्री सचिवालयाच्या समिती कक्षात नागपूर, गडचिरोली आणि अमरावती येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीद्वारे गोवारी (गोंड गोवारी) जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणींबाबत नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत प्रवेशासाठी नोंदणी केल्यानंतर दिलेल्या मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर सादर करणे गरजेचे आहे.

लॉकडाऊन काळात प्रमाणपत्र मिळविणे विद्यार्थ्यांना गैरसोयीचे होत असल्याने विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचा मोठा पेच निर्माण झालेला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता समितीने तातडीने जात पडताळणी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. तसेच जातपडताळणी प्रमाणपत्रांबाबत ज्यांच्या तक्रारी आहेत, त्या प्रकरणांची खात्री करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशा सूचना नाना पटोले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील विद्यार्थ्यांनाही जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात. हे लक्षात घेऊन मराठा समाजासह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील सर्व विद्यार्थ्यांना सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details