नागपूर -कापसाला 14 ते 15 हजार रुपये प्रति क्विंटल विक्रमी भाव ( highest price for cotton ) मिळाल्याने याही वर्षी पुन्हा एकदा शेतकरी वर्ग कापसाच्या पिकाला प्राधान्य ( Farmers prefer cotton crop ) देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बी-बियाणे खरेदीसाठी ( Seed purchase ) कृषी केंद्रांवर जात असलेले बहुतांश शेतकरी कापसाचे वाण खरेदी करण्याला पाहिले प्राधान्य देत आहेत. त्यामुळे यावर्षी कापसाचा पेरा 30 ते 40 टक्क्यांनी वाढणार ( Sowing of cotton will increase ) असा अंदाज बी-बियाणे विक्रीवरून वर्तवण्यात येत आहे. तर, मिरचीचे लागवड क्षेत्र कमी होण्याचा ( Decreased chilli cultivation) अंदाज कृषी दुकानदाराने व्यक्त केला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाणांच्या किमतींमध्ये काहीशी वाढ ( increase seed prices ) झालेली आहे.
पेरणीच्या कामाला वेग -यावर्षी विदर्भात मानसून काहीसा उशिराने दाखल झाला असला तरी, देखील शेतकरी वर्ग शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. पहिल्या पावसाचे आगमन होताच पेरणीच्या कामाला वेग ( Accelerate sowing work ) आलेला आहे. पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा बी बियाणे तसेच खते खरेदीसाठी कृषी दुकानात वळवला आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना कापसाला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकरी कापसाकडे वळताना दिसत आहेत. याशिवाय सोयाबीनची लागवड ( Soybean cultivation ) करण्यात देखील शेतकरी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.
विदर्भात कापसाला चांगले दिवस - विदर्भ कापसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, मागील काही वर्षात कापसाला पाहिजे तसे भाव मिळत नव्हता. त्यातून शेतीचा खर्च देखील भागात नसल्याने शेतकरी दुसऱ्या पिकांकडे वळू लागले होते. मात्र, यावर्षी कधी नव्हे तो प्रति क्विंटल मागे विक्रमी भाव शेतकऱ्यांना मिळाला. त्यामुळे यावर्षी शेतकरी कापसाला पहिली पसंती देत आहेत.