महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संपत्तीच्या वादातून मुलानेच केला वडिलांचा खून - नागपूर क्राईम लेटेस्ट न्यूज

आरोपी शेख युनूस शेख युसूफ याने वडिलांना जखमी केल्यानंतर तो स्वतः गणेशपेठ पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने घडलेली संपूर्ण घटना सांगितल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र, तोपर्यंत शेख युसूफ वल्द शेख शरीफ यांचा मृत्यू झाला होता.

संपत्तीच्या वादातून मुलानेच केला वडिलांचा खून
संपत्तीच्या वादातून मुलानेच केला वडिलांचा खून

By

Published : Feb 24, 2021, 4:51 PM IST

Updated : Feb 24, 2021, 5:59 PM IST

नागपूर- संपत्तीच्या वादातून मुलाने केला वडिलांचा खून केल्याची खळबळजनक घटना नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. शेख युसूफ वल्द शेख शरीफ असे मृतकाचे नाव आहे तर शेख युनूस शेख युसूफ असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि मृतक यांच्यात संपत्तीच्या कारणावरून वाद झाला असताना मुलाने वडिलांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने स्वत:हून पोलीस हजर होत गुन्ह्याची कबुली दिली आहे.

संपत्तीच्या वादातून मुलानेच केला वडिलांचा खून

संपत्तीच्या वादातून मारहाण

काही महिन्यांपूर्वी मृतक शेख युसूफ यांनी आपेल राहते घर शेजारच्यांना विकले होते. त्यामुळे शेजारी युनूसला घर रिकामे करून देण्यासाठी तगादा लावत होते. यावरुन वडील शरीफ आणि युनूस यांच्यात वाद निर्माण होऊन कडाक्याचे भांडण झाले. मी माझ्या बायको पोरांना घेऊन कुठे जाणार नाही असा पवित्रा आरोपीने घेतल्यानंतर वादाचे रूपांतर मारामारीमध्ये झाले. तेव्हा आरोपी शेख युनूस शेख युसूफ याने रागाच्या भरात वडील शेख युसूफ वल्द शेख शरीफ यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून जखमी केले. यामध्ये वडिलांचा मृत्यू झाला. यावेळी मृतक आणि आरोपींच्या कुटुंबियांसह परिसरातील अनेक नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र, कुणीही मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला नाही.


आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर
आरोपी शेख युनूस शेख युसूफ याने वडिलांना जखमी केल्यानंतर तो स्वतः गणेशपेठ पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने घडलेली संपूर्ण घटना सांगितल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र, तोपर्यंत शेख युसूफ वल्द शेख शरीफ यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपी शेख युनूस शेख युसूफ याला वडिलांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे.

Last Updated : Feb 24, 2021, 5:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details