महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Smita Singalkar On Nagpur Bench Decision: तोकडे कपडे प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याने घेतला मोकळा श्वास - स्मिता सिंगलकर - पॅराडाईज रिसॉर्ट वॉटर पार्क

Smita Singalkar On Nagpur Bench Decision: महिलांनी तोकडे कपडे (short dress case) घालून नृत्य केले म्हणजे अश्लीलता होत नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा हा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. तोकडे कपडे घालून केलेले नृत्य अथवा हातवारेसुद्धा (Advocate Smita Singalkar) अश्लीलतेच्या श्रेणीत येत नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. महिलांनी तोकडे कपडे घालणं ही आता अगदीचं सामान्य गोष्ट आहे. स्त्रीने असे कपडे घातले तर त्याला अश्लीलता म्हणता येणार नाही, असं देखील कोर्टाने म्हटलं आहे.

Smita Singalkar On Nagpur Bench Decision
स्मिता सिंगलकर

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2023, 4:47 PM IST

तोकड्या कपड्यांविषयी नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर वकील स्मिता सिंगलकर यांचे मत

नागपूर Smita Singalkar On Nagpur Bench Decision :महिलांनी सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालणं आता सामान्य बाब झाली आहे. आपण चित्रपट किंवा सौंदर्य स्पर्धांमध्ये तोकडे कपडे घातलेल्या महिला नियमित पाहतो. यामुळे नागरिकांना त्रास होत नाही, असं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवलं आहे.


काय आहे नेमकं प्रकरण :उमरेड तालुक्यातील एका रिसॉर्टमध्ये ३१ मे रोजी पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्या पार्टीत तोकडे कपडे घातलेल्या महिला नृत्य करीत होत्या. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकून भारतीय दंड विधान, महाराष्ट्र पोलीस कायदा व महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील संबंधित कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवून पार्टीत उपस्थितांना अटक केली होती.


अभिव्यक्ती स्वातंत्र्याने घेतला मोकळा श्वास :न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण हे आधुनिक प्रकारचे आहे. एकीकडे तोकडे कपडे परिधान केलेल्या महिलांना मंदिरांमध्ये प्रवेश नाकारला जातो. तर दुसरीकडे पिढीला घडवणारा समाज म्हणून आपणचं कारणीभूत आहोत. आपणचं त्यांना तसं वाढवलं आहे आणि विचार दिलेले आहेत. अनुकरणातून पिढी शिकते. संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्त करण्याचा मग तो कपडे निवडीचा अधिकार असो की धर्म पालन करायचा असो किंवा जोडीदार निवडीचा असू शकतो. न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाल्याचं ज्येष्ठ वकील स्मिता सिंगलकर म्हणाल्या आहेत.

छोटा स्कर्ट घालणे अश्लीलता नाही :नागपूर जिल्ह्यातील पॅराडाईज रिसॉर्ट वॉटर पार्कमध्ये ३१ मे २०२३ रोजी तिरखुरा येथील हॉटेलवर पोलिसांनी धाड घातली. त्यावेळी सहा महिला या छोट्या स्कर्टमध्ये नाचताना आढळल्या होत्या. त्या महिला पुरुषांच्या पुढे नाचत असताना त्यांच्यावर पैसे देखील उधळल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे त्यांनी महिलांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र यापैकी पाच महिलांनी हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केली. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही छोटे स्कर्ट घालून जे काम करत होतो, ते अश्लील या व्याख्येत मोडत नाही. त्यामुळेच आमच्यावरील गुन्हा रद्द करावा, अशी मागणी त्या महिलांनी केली होती.

हेही वाचा:

  1. SC Hearing on MLA : आमदार अपात्रता प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टानं झापलं, म्हणाले कोर्टाच्या निकालाची बूज राखायला विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगा
  2. Notice to ED : नागपुरातील 'त्या' प्रकरणात ईडीला नोटीस; चार आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश
  3. विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणे हा विनयभंगाचा गुन्हा, नागपूर खंडपीठाचा निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details