नागपूर - अंत्यविधीच्या वेळी क्षमतेपेक्षा जास्त लोकांची गर्दी घरावर झाल्याने घराचा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील टाकळी गावात घडली आहे. विमल रमेश भोयर असे मृत महिलेचे नाव आहे. तर ५ महिला जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नागपूरमध्ये अंत्यविधी सुरू असताना स्लॅब कोसळला, महिलेचा मृत्यू - nagpur
अंत्यविधीच्या वेळी क्षमतेपेक्षा जास्त लोकांची गर्दी घरावर झाल्याने घराचा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील टाकळी गावात घडली आहे.
कळी गावात राहणाऱ्या आशिष नावाच्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक एकत्रित झाले होते. अंत्ययात्रा निघताना नातेवाईक मंडळी एका स्लॅबवर उभे झाले होते. त्याचवेळी नवीनच टाकलेल्या स्लॅबवर क्षमतेपेक्षा जास्त महिला उभ्या झाल्याने तो स्लॅब कोसळला. त्यामुळे काही महिला जखमी झाल्या आहेत.
त्यापैकी विमल रमेश भोयर नामक महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, विमल भोयर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय शकुंतला महादेव डोळस, गोदाबाई जयपाल खराबे, राधाबाई क्रीष्णा ईश्वरकर, रत्नमाला मनोहर रामटेके या महिला जखमी आहेत.