महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूरमध्ये कोरोनाचा धोका वाढला; सकाळच्या सत्रात तब्बल ६१ रुग्णांची नोंद - नागपूर लेटेस्ट न्यूज

जिल्ह्यात ६१ कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने रुग्णांची संख्या ८४० वर पोहोचली आहे. आतापर्यंत ५०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Nagpur corona update
नागपूर कोरोना अपडेट

By

Published : Jun 10, 2020, 12:54 PM IST

नागपूर -राज्याच्या उपराजधानीत कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढला आहे. आज सकाळच्या सत्रात ६१ कोरोना संशयितांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८४० वर गेली आहे.

आज पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण नाईक आणि बांगलादेश परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत ५०० रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले असून १५ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून ३२५ झाली आहे.

नागपूर कोरोना अपडेट

या पूर्वी एकाच दिवशी ६३ रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर आज ६१ कोरोनाबाधित रुग्ण पुढे आले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात जुना रेकॉर्ड मोडीत निघून एकाच दिवसात सर्वोच्च रुग्ण संख्या पुढे येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details