महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूरमध्ये ६५९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; २०९ जण कोरोनामुक्त

दिवसभरात ६५९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने नागपुरातील एकूण रुग्णसंख्या ८४०६ इतकी झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५५६ इतकी झाली आहे. सध्या ३५६८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Nagpur Corona Update
नागपूर कोरोना अपडेट

By

Published : Aug 9, 2020, 7:53 AM IST

नागपूर-शनिवारी नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्याच्या उपराजधानीत दिवसभरात तब्बल ६५९ नवीन रुग्णांची नोंद झाली. नागपुरात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नागपुरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने पाचशेचा टप्पा ओलांडला.

दिवसभरात ६५९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने नागपुरातील एकूण रुग्णसंख्या ८४०६ इतकी झाली आहे. यामध्ये १२१ रुग्ण हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत. एकूण रुग्णसंख्येपैकी २६५० रुग्ण नागपूर ग्रामीणच्या विविध तालुक्यातील आहेत तर ५७५६ रुग्ण नागपूर शहरातील आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या ६५९ रुग्णांपैकी १०९ रुग्ण नागपूर ग्रामीण भागातील आहेत. ५५० रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यात त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वाना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

२०९ कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५५६ इतकी झाली आहे. याशिवाय शनिवारी २३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे नागपूरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची एकूण संख्या २९२ इतकी झाली आहे. महत्वाचे म्हणजे २९२ पैकी २४८ मृत्यू हे नागपूर जिल्ह्यातील आहेत तर ४४ मृत्यू हे जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे आहेत. यामध्ये अमरावती आणि अकोला येथील कोरोनामुळे नागपुरात मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.

सध्या नागपुरातील २८ ठिकाणी ३५६८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ५४.०८ टक्के इतके आहे,तर एकूण मृत्यू दर हा ३.४७ इतका आहे. शिवाय मूळ नागपूरातील रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची टक्केवारी २.९५ इतकी आहे.

दरम्यान, राज्यात शनिवारी १२८२२ कोरोना रुग्णांची वाढ झाली. यामुळे राज्याची एकूण रुग्णसंख्या ५०३०८४ अशी झाली आहे. शनिवारी ११०८१ रुग्ण बरे झाले आहेत. ३३८३६२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहे. राज्यात एकूण १४७०४८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details