महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरातील पाच मतदारसंघात भाजपची जुन्यांनाच पसंती, आमदार कोहळेंचा पत्ता कट - cm devendra fadanvis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात विधानसभेची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी एका विद्यमान आमदाराचे तिकीट कापले आहे.

विद्यमान आमदार सुधाकर कोहळे

By

Published : Oct 1, 2019, 7:58 PM IST

Updated : Oct 1, 2019, 8:24 PM IST

नागपूर - युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी एका विद्यमान आमदाराचे तिकीट कापले आहे. दक्षिण नागपूर मतदार संघातील विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या जागी माजी आमदार मोहन मते यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे कोहळे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नागपुरातील पाच मतदारसंघात भाजपची जुन्यांनाच पसंती

हेही वाचा - मुख्यंमत्री फडणवीस यांना 'सर्वोच्च' झटका, प्रलंबित गुन्ह्यांची माहिती प्रकरणी खटला पुन्हा चालणार

विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघे ३ दिवस शिल्लक राहिले असताना भारतीय जनता पक्षाने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यादीनुसार बहुतांश जुन्याच आमदारांवर विश्वास टाकण्यात आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. नागपूर शहरातील ६ विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद वर्चस्व आहे. या निवडणुकीत नागपुरातील निम्या आमदारांचे तिकीट भाजप कापणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, केवळ दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधाकर कोहळे यांचीच उमेदवारी पक्षाने नाकारली आहे. इतर ५ विद्यमान आमदारांना पुन्हा भाजपने संधी दिली आहे. ज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पारंपरिक दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेसला अद्यापही उमेदवार गवसला नसल्याने फडणवीस यांच्या विजयाचा मार्ग सुकर असल्याचे चित्र आहे. याशिवाय पूर्व विधानसभा मतदारसंघातून फडणवीस आणि गडकरींचे निकटवर्तीय समजले जाणारे दोन वेळचे आमदार कृष्णा खोपडे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. या मतदारसंघासाठी शिवसेना आग्रही होती. नागपुरात सर्वाधिक विकासकामे पूर्व नागपुरात झाल्याने खोपडे यांची दावेदारी मजबूत मानली जात होती. पश्चिम विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा सुधाकर देशमुख यांच्या नावावर दाव शिक्कामोर्तब केले आहे. सुधाकर देशमुख हेसुद्धा गेल्या २ पंचवार्षीक आमदार आहेत.

हेही वाचा - युतीच्या नेत्यांना 'या' गोष्टीची वाटतेय भिती?...म्हणूनच दडवला जातोय जागा वाटपाचा फॉर्म्युला!

बहुजन मतदार प्राबल्य असणाऱ्या उत्तर नागपुरातून डॉक्टर मिलिंद माने यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मिलिंद माने यांनी माजी मंत्री नितीन राऊत यांचा पराभव करत विधानसभा गाठली होती. लोकसभा निवडणुकीत उत्तर नागपुरातून भाजपचे मताधिक्य कमी झाल्याने यावेळी मिलिंद माने यांना याचा फटका बसेल अशी शक्यता वर्तवली जात असताना पक्षाने पुन्हा त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर सर्वांना उत्सुकता होती ती म्हणजे दक्षिण नागपूर मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

भाजपने विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांच्याजागी माजी आमदार मोहन मते यांना उमेदवारी दिली आहे. मध्य नागपुरातून विद्यमान आमदार विकास कुंभारे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी मध्य नागपूरला नवीन आमदार मिळेल अशी चर्चा होती मात्र विकास कुंभारे हे स्वतःची उमेदवारी वाचवण्यात यशस्वी ठरले आहे. मध्य नागपूर या मतदारसंघात हलबा समाजाचे प्राबल्य असून आमदार विकास कुंभारे हे देखील हलबा समाजातुन येत असल्याने भाजपने योग्य डाव टाकला आहे.

हेही वाचा - 'कोथरूड जितके मला माहित आहे, तितके कोणालाच माहित नाही'

Last Updated : Oct 1, 2019, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details