नागपूर - शहराच्या मध्यभागी असलेल्या सीताबर्डी किल्ल्यावर सैनिकांची प्रादेशिक 118 बटालीयन आहे. या बटालीयनला इथून स्थलांतरित करण्याच्या विरोधात आता शिवकालीन किल्ला बचाव समितीने विरोध केला आहे. हा किल्ला आणि नागपूरची बटालीयन वाचवा, अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे.
नागपुरातील सीताबर्डी किल्ल्यावरील बटालीयन भुसावळला स्थानांतरित; स्थानिकांचा विरोध - sitabardi fort batalian transfer bhusawal
ब्रिटिश काळापासून नागपूरच्या ऐतिहासिक सीताबर्डी किल्ल्यावर प्रादेशिक सेनेची 118 बटालीयन होती. मात्र, आता ही बटालियन भुसावळ येथे स्थानांतरित केली आहे. या मागे किल्ल्यावरील 1000 एकर जमीन हडपण्याचा डाव असल्याचा आरोप समितीने केला आहे.
ब्रिटिश काळापासून नागपूरच्या ऐतिहासिक सीताबर्डी किल्ल्यावर प्रादेशिक सेनेची 118 बटालीयन होती. मात्र, आता ही बटालियन भुसावळ येथे स्थानांतरित केली आहे. या मागे किल्ल्यावरील 1000 एकर जमीन हडपण्याचा डाव असल्याचा आरोप समितीने केला आहे. याविरोधात संविधान चौकात समितीच्या सदस्यांनी धरणा प्रदर्शन केले. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बटालियन स्थानांतरित करण्याचा डाव आखल्याचा आरोप देखील समितीचे अविनाश काकडे यांनी केला. सेनेची 118 बटालीयन हे नागपूर शहराचे वैभव आहे. हे वैभव नाहीसे करण्याचा राजकीय डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा -'केंद्राला कोरेगाव-भीमा प्रकरणात काहीतरी झाकायचंय... म्हणूनच तपास 'एनआयए'कडे'