नागपूर Shri Ram Name Tattoo : कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचं आणि आस्थेचं प्रमुख केंद्र असलेल्या प्रभू श्रीरामाचं अयोध्येत मंदिर निर्माण कार्य पूर्णत्वास येत आहे. येत्या २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिरात विराजमान होणार आहेत. त्यामुळेचं संपूर्ण भारतात हा उत्सव अतिशय आगळ्या-वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. इथे प्रत्येकाला जाणे शक्य नाही. त्यामुळे श्रीरामाचा हा उत्सव ज्याला जमेल तसा साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. (Ram tattoo record)
घरच्यांनी आणि मित्रांनी दिलं प्रोत्साहन:रितिक दरोडे तरुण दिवसाला ५० ते ६० लोकांच्या हातावर श्रीराम नावाचा टॅटू काढत असून येत्या २२ जानेवारीला त्याचा हा संकल्प पूर्णत्वाला जाईल, असा विश्वास रितिकने व्यक्त केलाय. त्याच्या या कामात त्याचे वडील राजेंद्र, बहीण रोशनी आणि मित्र हातभार लावत आहेत. रितीकची प्रभू श्रीरामात प्रचंड श्रद्धा आहे. तो दरवर्षी रामजन्मोत्सवात काही-तरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतो. २२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम विराजमान होणार, ही आनंदवार्ता समजल्यापासून तो काहीतरी नाविन्यपूर्ण करण्यासाठी धडपडत होता. किमान १०१ लोकांच्या हातावर टॅटू काढण्याची संकल्पना वडिलांसमोर मांडली. त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर त्याने ही संकल्पना मित्रांकडे बोलून दाखवली. तेव्हा मित्रांना देखील ती संकल्पना आवडली. मात्र, त्यांनी १०१ पेक्षा १००१ लोकांच्या हातात टॅटू काढ आम्ही आर्थिक पाठबळ देऊ, असं मान्य केल्यानंतर रितीकने हा प्रवास सुरू केला आहे.
'हा' माझ्यासाठी अभिमानाचा क्षण:हजारो वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कोट्यवधी हिंदूच्या स्वप्नातील श्रीराम मंदिर अयोध्येत उभं राहिलंय. येत्या २२ जानेवारीला रामलल्ला भव्य-दिव्य अशा मंदिरात विराजमान होणार आहे. हा क्षण हिंदूंसाठी ऐतिहासिक असणार आहे. यानिमित्तानं मला माझ्या कलेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली आहे. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना त्यानं व्यक्त केली आहे.