नागपूर- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. शहरात कलम 144 लागू झाल्यानंतर जमावबंदी रोखण्यासाठी आता रेस्टॉरंट, वाईन शॉप, रस्त्यावरील दुकाने पुढील 3 दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणू : नागपुरात तीन दिवसांसाठी लाॅकडाऊन...'या' ठिकाणांना लागणार टाळे - corona virus update news
गेल्या दोन आठवड्यापासून देशात कोरोना विषाणूने सुमारे दीडशे नागरिकांना आपल्या विळख्यात ओढले आहे. त्यामुळे खबरदारी आणि पुढील धोका टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येक स्तरावर प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.
हेही वाचा-CORONA : गर्दी कमी केली नाही तर मुंबई लोकल बंद करावी लागेल - आरोग्य मंत्री राजेश टोपे
गेल्या दोन आठवड्यापासून देशात कोरोना विषाणूने सुमारे दीडशे नागरिकांना आपल्या विळख्यात ओढले आहे. त्यामुळे खबरदारी आणि पुढील धोका टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येक स्तरावर प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. शासनाच्या प्रयत्नांना आणखी चांगले यश मिळावे यासाठी नागपुरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शहरातील हॉटेल्स, दुकाने, रेस्टॉरंट, बार आणि दुकाने पुढील तीन दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने दिलेला आदेश मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.