नागपूर - नागपूर जिल्ह्याच्या सावनेर येथे चार मित्रांपैकी तीन मित्र बाकावर बसले होते. चौथा मित्र गाडी रिव्हर्स घेताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ( Nagpur Car Out Of Control ) मागे बाकावर बसलेले दोघे जण गाडीखाली ( Car Hits Three Friends ) आले. हा थरारक प्रसंग लगतच्या दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असली तरी, पोलिसांकडे याची कुठलीही नोंद नाही.
नागपूरमध्ये अनियंत्रित कारचा थरार, मित्रांच्या अंगावर चढवली, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
चालक होता दारूच्या नशेत
आंध्र प्रदेशातील तिघे मित्र हे सावनेर येथे जेवण आणि मद्यप्राशनसाठी ढाब्यावर थांबले होते. त्यांनी जेवणासोबत मद्यपान केल्याचे बोलले जात आहे. यानंतर ते बाहेर परत जाण्यासाठी निघाले. जेवणानंतर तिघेजण पान टपरी जवळील बाकावर जाऊन बसले होते. तर चौथा मित्र कार काढत होता. चौथा मित्र हा दारूच्या नशेत कार रिव्हर्स घेताना त्याचे नियंत्रण सुटले आणि रिव्हर्स कार बाकावर बसलेल्या मित्रांच्या अंगावर गेल्याने एकाला चक्क फरफटत नेले.
सीसीटीव्हीचा व्हिडीओ व्हायरल
हा अपघात दारूच्या नशेत कार रिव्हर्स घेताना ब्रेक ऐवजी एक्सीलेटर दबल्याने घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सावनेरमध्ये दादाजीनगर कॉर्नरवर ही दुर्घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाली आहे. या घटनेत एक जण गंभीर तर, दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. धक्कादायक म्हणजे घटनेनंतर कारचालक जखमी व्यक्तीला घेऊन अज्ञातस्थळी निघून गेला. या घटनेची पोलिसांकडे कुठलीच नोंद नाही. मात्र घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे.