महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिवाळी अधिवेशन : 'आरेची जमीन विकासकांच्या घशात घालण्याचा आरोप खोटा' - winter session latest news sunil prabhu

आरेच्या वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात वनीकरण व्हावे तसेच तिथे पिढ्यानपिढ्या आदिवासी पाड्यात राहत असलेल्या वस्त्यांचा विकास व्हावा, यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र, तरीदेखील भाजपने या विषयाचा विपर्यास करून धादांत खोटे आरोप केला, असे आमदार प्रभू म्हणाले.

MLA Sunil Prabhu
आमदार सुनिल प्रभू

By

Published : Dec 19, 2019, 4:03 PM IST

Updated : Dec 19, 2019, 5:09 PM IST

नागपूर - आरेच्या जंगलातील वन-जमीन शिवसेना खासगी विकासकांच्या घशात घालण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप खोटा आहे, असे आमदार सुनिल प्रभू यांनी सांगितले आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केल्यानंतर शिवसेनेकडून या आरोपाला उत्तर देण्यात आले.

शिवसेना आमदार सुनिल प्रभू

आरेच्या वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात वनीकरण व्हावे तसेच तिथे पिढ्यानपिढ्या आदिवासी पाड्यात राहत असलेल्या वस्त्यांचा विकास व्हावा, यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र, तरीदेखील भाजपने या विषयाचा विपर्यास करून धादांत खोटे आरोप केला, असे आमदार प्रभू म्हणाले.

हेही वाचा -हिवाळी अधिवेशन : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक, सभात्यागानंतर सभागृहाचे कामकाज सुरू

गेल्या २ दिवसांच्या गदारोळानंतर बुधवारी विधानसभेचे कामकाज सुरळीत सुरू झाले. आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. आज विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला.

Last Updated : Dec 19, 2019, 5:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details