नागपूर - अनलॉक झाल्यापासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दररोज वाढ होत आहे. त्यामुळे अगोदरच सर्वसामान्य नागरिकांचे बिघडलेले आर्थिक गणित आता आणखी बिघडले आहे. या विरोधात नागपूरात शिवसेना आणि काँग्रेस पक्षाकडून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने करण्यात आली. काँग्रेसकडून मेडिकल चौकात तर शिवसेनेने संविधान चौकात आंदोलन केले.
पेट्रोल- डिझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेना व काँग्रेस आक्रमक - नागपूर काँग्रेस आंदोलन
कोरोनामुळे जनतेची सर्वबाजूने आर्थिक कोंडी झाली असताना केंद्र सरकार करत असलेली पेट्रोल-डिझेलच्या किमतीमधील वाढ नागरिकांना परवडणारी नाही. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले.
![पेट्रोल- डिझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेना व काँग्रेस आक्रमक Congress Agitation](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7782475-938-7782475-1593178996071.jpg)
मार्च महिन्याच्या शेवटी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागल्यामुळे केंद्र सरकारने २५ मार्चपासून देशात टाळेबंदी केली. टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या संकटात आल्या आहेत तर काहींनी आपल्या नोकऱ्या गमावल्या देखील आहेत. अनेकांचे उदयोगधंदे संकटात आले आहेत. जनतेची सर्वबाजूने आर्थिक कोंडी झाली असताना केंद्र सरकार करत असलेली पेट्रोल-डिझेलच्या किमतीमधील वाढ नागरिकांना परवडणारी नाही. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले.
जागतिक बाजारपेठेत कच्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण होत असताना देखील आपल्या देशात तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. मागील पंधरा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दारांमध्ये प्रति लिटर आठ ते दहा रुपयांची वाढ करून केंद्र सरकारने जनतेची लूट चालवली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.