नागपूर -नुकासनग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे सरसकट पंचनामे व्हावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ३३ टक्के नुकसान झालेल्या पिकांचेच पंचनामे होतील, असे सरकार म्हणत आहे. मात्र, मी प्रत्यक्ष पाहणी केली असता जास्त नुकसान झाल्याचे निदर्शनास आले असल्याचे पवार म्हणाले.
नुकासनग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे सरसकट पंचनामे करा - शरद पवार - शरद पवारांची मागणी
नुकासनग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे सरसकट पंचनामे व्हावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ३३ टक्के नुकसान झालेल्या पिकांचेच पंचनामे होतील, असे सरकार म्हणत आहे. मात्र, मी प्रत्यक्ष पाहणी केली असता जास्त नुकसान झाल्याचे निदर्शनास आले असल्याचे पवार म्हणाले.
विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची शरद पवार यांनी पाहणी केली. त्यानंतर नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करावे अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना काय आणि कशी मदत करता येईल, याचाही आम्ही अभ्यास करू. केंद्र सरकारमधील कृषी आणि अर्थमंत्र्यांना भेटून केंद्र सरकारने यासंबंधी बैठक बोलवावी. तसेच शेती संबंधित संस्था, राज्य सरकारचे प्रतिनिधी यांना बैठकीसाठी बोलवावे असा प्रस्ताव मांडणार असल्याचे प्रस्ताव म्हणाले.
विदर्भातील महत्त्वाच्या पिकांवर अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे. संत्रा, मोसंबी, धान, कपाशी, सोयाबिन आणि काही ठिकाणी ज्वारीच्या पिकांवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचे अभूतपूर्व अशा प्रकारचे नुकसान झाल्याचे पवार म्हणाले. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पिकांसाठी कर्ज घेतले होते. अवकाळी पावसात पिक गेले, मात्र, कर्ज राहिले. त्यामुळे कर्जमाफी करून केंद्र सरकारच्या अर्थखात्याकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देता येईल का? याबाबतही प्रयत्न करणार असल्याचे पवार म्हणाले.