नागपूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे आज नागपुरमध्ये आगमन झाले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या 3 पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेत विराजमान झाल्यानंतर हे नागपुरातील पहिले हिवाळी अधिवेशन आहे. विदर्भातील जनतेच्या न्याय मागण्यांबाबत सरकारला मार्गदर्शन करणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनेचा पूर्व आणि पश्चिम विदर्भात विस्तार करण्यासाठी नागपुरात आले आहेत.
शरद पवार नागपुरात दाखल, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या वाढदिसाला राहणार हजर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बुधवारी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा 85 वा वाढदिवस नागपुरात महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या पुढाकाराने होत आहे.
हेही वाचा - कोस्टल हायवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट - एकनाथ शिंदे
तसेच बुधवारी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा 85 वा वाढदिवस नागपुरात महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या पुढाकाराने होत आहे. राज्यातील सत्ता स्थापनेत खासकरून काँग्रेसला सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रतिभा पाटील यांनी काँग्रेस श्रेष्ठींशी चर्चा केली होती, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 19 डिसेंबरला प्रतिभा पाटील यांच्या वाढदिवस सत्काराच्या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत.